प्रल्हाद चव्हाण यांच्या स्मृतिदिनी केलेला कार्यकर्त्यांचा गौरव कौतुकास्पद   खासदार शाहू महाराज यांचे उद्गार प्रल्हाद चव्हाण यांचा पहिला स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने संपन्न

Spread the news

 

प्रल्हाद चव्हाण यांच्या स्मृतिदिनी केलेला कार्यकर्त्यांचा गौरव कौतुकास्पद

 

खासदार शाहू महाराज यांचे उद्गार

प्रल्हाद चव्हाण यांचा पहिला स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने संपन्न

कोल्हापूर

आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि सहकाऱ्यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे असे उद्गार खासदार शाहू महाराज यांनी काढले.

 शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि माजी महापौर प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त प्रल्हाद चव्हाण युवा मंच च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुरस्कार, सहकाऱ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अशा संयुक्त कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते.

 खासदार शाहू महाराज म्हणाले, काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन प्रल्हाद चव्हाण यांनी अतिशय पक्ष मजबूत करण्याचा काम केले. अनेक कठीण परिस्थितीतही  डगमगता त्यांनी पक्षाची सेवा केली. त्यांच्यानंतर सागर चव्हाण  सचिन चव्हाण या दोन्ही सुपुत्रांनी पक्षाचे काम अतिशय निष्ठापूर्वक सुरू ठेवले आहे. त्यांच्याकडून वडिलांच्या स्मृतिदिनी विविध व्यक्तींचा, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान केला गेला. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.

 आमदार सतेज पाटील म्हणाले, ज्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी काँग्रेस पक्ष वाढवला. त्या व्यक्तींचा आदर आणि आठवण ठेवत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून प्रल्हाद चव्हाण यांची ओळख होती. कोल्हापुरात त्यांनीच काँग्रेसचा पाया भक्कम केला. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्यासोबत काम केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याबरोबरच मंडप व्यवसायातील सहकाऱ्यांचा सन्मान सागर चव्हाण आणि सचिन चव्हाण यांनी केला. त्यांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच आदर्शवत आहे. या दोन्ही बंधूंनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.  

प्रारंभी माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी स्वागत  प्रास्ताविक केले. यावेळी प्रल्हाद चव्हाण निष्ठावंत कार्यकर्ता गौरव पुरस्कार  डॉ. महादेव निकम  बाळाबाई निंबाळकर यांना खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रल्हाद चव्हाण यांच्या सोबत मंडप व्यवसायात काम केलेल्या तुकाराम हरि पाटील, पांडूरंग लक्ष्मण बोगरे, श्रीकांत सांगावे यांचा सन्मान करण्यात आला. या सर्वांना रोख अकरा हजार रूपये व मानचिन्ह देण्यात आले. माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे यांना पत्नीच्या उपचारासाठी एक लाखाची मदत करण्यात आली.  पीएसआय परीक्षेत यश मिळवलेल्या मनाली शिंदे हिचा सत्कार ही यावेळी करण्यात आला. प्रल्हाद चव्हाण यांची आठवण म्हणून सचिन साळी यांना बांधून दिलेल्या घरकुलाच्या चाव्या खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. आभार माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी मानले.

या कार्यक्रमास आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, राजीव आवळे,  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवारशिवसेनेचे उपनेते संजय पवार, सह संपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, माझी महापौर सागर चव्हाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, काँग्रेसचे पदाधिकारी शशांक बावचकर, सुलोचना नाईकवाडे, सरलाताई पाटील, मनीषा गवळी, दीपा मगदूम, आपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप देसाई,कॉ. चंद्रकांत यादव, प्रफुल्ल जोशी, मदन चोडणकर, माजी नगरसेवक रवी आवळे, प्रकाश चौगुले, प्रकाश नाईकनवरे, रामदास भाले, महेश सावंत, अजित मोरे, डॉ. अजय केणी, डॉ. संगीता निंबाळकर, डॉ. संतोष निंबाळकर, अशोकराव भंडारे, बी. के. डोंगळे, प्रतापसिंह जाधव, किशोर खानविलकर, राहुल मुणुद, विनय सूर्यवंशी, प्रदीप चव्हाण, रंगराव देवणे, अशोकराव गायकवाड, प्रदीप शेलार, दुर्वास कदम, संजय पवार वाईकर, सम्राट बराले, संतोष पाटील, प्रवीण पुजारी, विनायक घोरपडे, अलमजीत शेख, कादर मलबारी, अमर जरग, संपत पाटील, सुजित देसाई, अमर देसाई, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होतेप्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचलन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!