७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा….
कोल्हापूर:ता.१५: ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमीत्य गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोकुळ प्रकल्पाबरोबरच ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्वजारोहन संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बोरवडे चिलिंग सेंटर संचालक नंदकुमार ढेंगे, लिंगनूर चिलिंग सेंटर संचालक नविद मुश्रीफ, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक डॉ.सुजित मिणचेकर, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक बयाजी शेळके व महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे संचालक मुरलीधर जाधव यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दूध उत्पादक, ग्राहक, वितरक,
यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदिप पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) प्रकाश साळुंखे, व्यवस्थापक (संकलन) शरद तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
—————————————————————————————————-
फोटो ओळ – गोकुळ दूध संघाच्या मुख्यप्रकल्प स्थळी ध्वजारोहन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत.
—————————————————————————————————-