हर घर तिरंगा अभियानाच्या जन जागृतीसाठी भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली संपन्न

Spread the news

हर घर तिरंगा अभियानाच्या जन जागृतीसाठी भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली संपन्न

कोल्हापूर दि.१४ हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. बिंदू चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले यांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वेशभूषेतील भाजपा कला सांस्कृतिक आघाडीचे पदाधिकारी यावेळी रॅलीत सहभागी झाले होते.
बिंदू चौक मार्गे सुरू झालेली बाईक रॅली पुढे मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, सत्यजित उर्फ नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रॅलीला संबोधित करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यामुळेच हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून हर घर तिरंगा यशस्वी करावे असे आवाहन केले.
भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे व त्यांच्या सहकार्यांनी रॅली यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
यावेळी सरचिटणीस गायत्री राऊत, डॉ सदानंद राजवर्धन, संजय सावंत, हेमंत आराध्ये, राजसिंह शेळके, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, दिग्विजय कालेकर, सुरेश खिस्ते, रूपाराणी निकम, वैभव माने, आशिष कपडेकर, अमर साठे, गिरीष साळोखे, प्रदीप उलपे, सचिन कुलकर्णी, सागर रांगोळे, सुरेश गुजर, सतीश घरपणकर, प्रकाश सरनाईक, सौ. ढवळे, सरिता हरुगले, श्वेता गायकवाड, कोमल देसाई, के. समश्री, छाया साळुंखे, शामली भाकरे, दिलीप मेत्रानी, रणजीत औंधकर, डॉ शिवानंद पाटील, प्रवीण शिंदे, पारस पालीचा, सतीश आंबर्डेकर, दिलीप बोंद्रे, कार्तिक देशपांडे, विशाल शिराळे, संतोष माळी, राजू जाधव, सचिन पोवार, महेश यादव, निरंजन घाटगे, सचिन मुधाले, अनिल कामत, योगेश कांगठाणी, अशोक लोहार, महादेव बिरंजे, हर्शांक हरळीकर, वंदना बंबलवाडे, महेश चौगले, बंकट सूर्यवंशी, वेदार्थ राजवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!