शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे महाधरणे आंदोलन* *निर्णयासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत ; 20 ऑगस्ट ला कोल्हापुरात आक्रमक आंदोलन करणार*

Spread the news

 

*शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे महाधरणे आंदोलन*

*निर्णयासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत ; 20 ऑगस्ट ला कोल्हापुरात आक्रमक आंदोलन करणार*

आज शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन केले. यावेळी झालेल्या चर्चेतून शासनाला आठ दिवसांची मुदत देत शक्तीपीठ महामार्ग निर्णय रद्दचा लेखी आदेश न काढल्यास 20 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग विरोधी संघर्ष समितीने एकमताने दिला आहे.

या आंदोलनामध्ये खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आ. ऋतुराज पाटील, गिरीश फोंडे, संजय बाबा घाटगे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, डॉ. मधुकर बाचुळकर, विक्रांत पाटील, वसंत मुळीक, वैभव कांबळे , प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना खा. शाहू महाराज म्हणाले,” सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. या शक्तीपीठ महामार्गाची कोणी देखील मागणी केलेली नाही. केवळ तोंडी स्थगिती न देता व शेतकऱ्यांना अंधारात ठेवत जमीन संपादनाची प्रक्रिया पुढे रेटू नये. हा महामार्ग रद्द करण्याबद्दल पोकळ आश्वासने न देता महामार्ग रद्दचा लेखी आदेश काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”

आ. ऋतुराज पाटील म्हणाले,” सतेज पाटील यांनी विधानसभेमध्ये सरकारला धारेवर धरले व हा महामार्ग रद्द करण्यासाठीचा आग्रह केला. सरकारने पंधरा दिवसात चर्चा शेतकऱ्यांशी व विरोधी पक्षाची करण्याची मान्य केले असताना याउलट पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणारे हे भित्रे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का लावला तर खबरदार आम्ही जनप्रतिनिधी पान प्राणपणाने लढू.”
समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,” लाडका बहीण व लाडका बहु असल्या योजना काढून सरकार जनतेला लास्ट देत आहे. सरकारला शेतकरी लाडका नाही का? या लाडक्या शेतकऱ्याचे म्हणणे ऐका व कंत्राटदारांचे खिसे बनणारा महामार्ग रद्द करून स्वतःचे सरकार वाचवा. महामार्ग रद्द न झाल्यास मार्गाची फेररचना करतो म्हणणारे सरकारची येणाऱ्या निवडणुकीत फेररचना आम्ही करू.”
माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले,” शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून शक्तीपीठ महामार्ग जर शेतकऱ्यांच्या वर लादत असाल तर शेतकरी देखील राज्यकर्त्यांच्या घरावरती नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही. केवळ स्थगिती व पोकळ घोषणा न करता तात्काळशक्तीपीठ महामार्ग रद्द करा”

यावेळी वसंत मुळीक, स्वाभिमानीचे वैभव कांबळे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील, प्रकाश पाटील, मानाजीराव भोसले, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, दादासो पाटील यांचीही भाषणे झाली.

यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणू सोडला. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जय जवान जय किसान, शेती वाचवा देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द नाही तर सरकार रद्द, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लडेंगे जितेंगे ” अशा घोषणा दिल्या.
धरणे आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. माणगाव येथील शेतकऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडू पाहणाऱ्या हातकणंगले पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर अशोक सायकर वरती कारवाई करण्याची मागणी व पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव गेल्याचे व स्थगिती जाहीर करून देखील गावांमध्ये नोटिसा पाठवल्याचे निदर्शनास आणून त्यांना शिष्टमंडळाने धारे वरती धरले.

यावर जिल्हाधिकारी म्हणाले,” काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण मंजुरी बद्दल सरकारची भूमिका जाहीर केली आहे की सरकारने अशी कोणतीही प्रक्रिया केलेली नाही तीच प्रशासनाची भूमिका आहे. आंदोलनाची स्थगिती असल्यामुळे कोणतीही प्रक्रिया पुढे भेटली जाणार नाही. आपले निवेदन मुंबईला शासनाकडे पाठवतो.”

या आंदोलनामध्ये हातकणंगले शिरोळ, कागल, करवीर भुदरगड, आजरा येथील विविध गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आ.ऋतुराज पाटील, गिरीश फोंडे, संजय बाबा घाटगे ,शिवाजी मगदूम. सम्राट मोरे , विक्रांत पाटील , प्रकाश पाटील, कृष्णात पाटील , शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील ,मानाजीराव भोसले,आनंदा पाटील, योगेश कुळमोवडे, शिवाजी पाटील , दादासो पाटील,युवराज शेटे, तानाजी भोसले,युवराज पाटील, नितीन मगदूम, संभाजी पाटील, जालिंदर पाटील, प्रवीण कांबळे, जे एन दळवी, युवराज कोईगडे, मच्छिंद्र मुगडे, आनंदा देसाई यासह शेतकरी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!