कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाधिक साखर निर्यातीचा पुरस्कार प्रदान

Spread the news

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाधिक साखर निर्यातीचा पुरस्कार प्रदान

हुपरी, दि. १० ऑगस्ट कलाप्माण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ वा ३० व्या गाळप हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नेशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फैक्टरीज् लि., नवी दिल्ली या संस्थेच्या वार्षिक साधारण सभेमध्ये सन्मानपूर्वक वितरण करण्यात आला. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कारखान्याने सन २०२२-२३ या हंगामात एकूण १.१५ लाख मे. टन साखरेची निर्यात केलेली आहे. केंद्रीय अब व सार्वजनिक वितरण मंत्रलायातील केंद्रीय मुख्य संचालक (साखर), नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या निवड समितीकडून देशातील साखर कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मुल्यांकन केल्यानंतर सन २०२२-२३ हंगामात सर्वाधिक साखर निर्यातीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री आदरणीय श्री. कृष्णपाल तसेब उत्तरप्रदेशचे ऊस आणि साखर विकास मंत्री श्री. चौधरी लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते आणि गुजरातचे माजी सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल आणि नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक देण्यात आला. सदा पुरस्कार वितरण समारंभास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार श्री. प्रकाशआण्णा आवाडे, व्हा. चेअरमन श्री. बाबासो चौगुले, डॉ. श्री. राहुल आवाडे व इतर संचालक आणि कार्यकारी संचालक श्री. मनोहर जोशी उपस्थित होते.

कलाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेल्या परितोषिकाबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी, ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी कामगार यांनी समाचन व्यक्त केले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!