पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा चार दिवस कोल्हापुरात ,  अनेक कार्यक्रम

Spread the news

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

चार दिवस कोल्हापुरात ,  अनेक कार्यक्रम

        कोल्हापूर, दि. 8 ) : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

शुक्रवार, दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता कागल येथे हणबर गल्ली वतीने नागपंचमी निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ:  पठाण मळा, रिंगरोड, कागल, ता. कागल ) सकाळी 11 वाजता सावर्डे बु. ता. कागल येथे इमारत बांधकाम कामगारांना प्रांपचिक साहित्य वाटप (स्थळ: सावर्डे बु. ता. कागल ) दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत राखीव दुपारी 4 वाजता छत्रपती शाहू सुत कामगार संघटना पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा (स्थळ:  बागल चौक) सायंकाळी शायनिंग युवक मंडळ म्हाकवे, ता. कागल यांच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती  (स्थळ:  म्हाकवे, ता. कागल), रात्री 8 वाजता राखीव, सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ:  निवासस्थान, कागल)

शनिवारी, दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वा. सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी  11 वाजता उत्तूर ता. आजरा येथे पक्ष कार्यालयामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी (स्थळ:  उत्तूर ता. आजरा) दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 4 वाजता  हसन मुश्रीफ फौंडेशन, कागल वतीने रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया व औषधोपचार करुन त्यांना जगण्याची नवसंजीवनी मिळाली.. या सर्वांना “शतायुषी व्हा” शुभेच्छा मेळावा (स्थळ:  श्री. यशवंत हायस्कूल समोर, निपाणी वेस, कागल) सायंकाळी 6 वाजता राखीव सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ:  निवासस्थान, कागल)

रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वा.सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 9.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगमन प्रसंगी स्वागत (स्थळ:  कोल्हापूर विमानतळ), सकाळी 9.45 ते 10.30 वाजेपर्यंत कोल्हापूर येथून इचलकरंजीकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत इचलकरंजी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व मेळावा (स्थळ:  इचलकरंजी) दुपारी 12 ते 12.45 वाजेपर्यंत कोल्हापूरकडे प्रयाण व आगमन  (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) दुपारी 12.45 ते 1.45 वाजेपर्यंत राखीव (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत कोल्हापूर पक्ष पदाधिकारी व बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा  (स्थळ: श्री रामकृष्ण हॉल मार्केट यार्ड जवळ, कोल्हापूर ) दुपारी 3.30 वाजता ऑलिंपिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या आई वडीलांचा सत्कार व पक्षाच्यावतीने निधी अर्पण, आकिवाट, ता. शिरोळ येथील अपघात दुर्घटनेत मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत अर्पण, नुकसान भरपाई वाटप, नागरिकांच्या गाठीभेटी, निवेदन स्वीकारणे (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) दुपारी 4.30 ते 5 वाजेपर्यंत कागलकडे प्रयाण व आगमन, सायंकाळी 5 वाजता कागल येथील पाझर तलाव येथे कागल नगर परिषद यांनी विकसित केलेल्या सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा, पादचारी मार्गाचे उद्घाटन, कृत्रिम धबधब्याचे उद्घाटन व म्युझिक फाऊंटनचे उद्घाटन (स्थळ: पाझर तलाव, कागल), महात्मा फुले मार्केट इमारत उद्घाटन समारंभ (स्थळ:  श्रीमंत बापूसो महाराज चौक, कागल) सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा व लाडक्या बहिणींकडून सत्कार समारंभ (स्थळ:  श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल समोर, निपाणी वेस, कागल) रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

किंवा

सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वा. सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता के.डी.सी.सी बँक कार्यकारी समितीची बैठक (स्थळ:  कोल्हापूर) दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 4 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयासंदर्भात बैठक (स्थळ:  जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

**

 

सेवा हमी कायद्यांतर्गत सुरू होणाऱ्या पथदर्शी प्रकल्पामध्ये

 प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी महत्त्वाची

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुरूवात होत आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे शासकीय सेवांचा लाभ वितरीत करण्यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी यामुळे वाढली असून ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. शासनाच्या विविध सेवांचे वितरण योग्य पध्दतीने आणि कमी वेळेत होण्यासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी शासन स्तरावरून होत आहे. कोल्हापूर जिल्हयातून दि.15 ऑगस्ट पासून सेवा हमी पथदर्शी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात होत आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभाग प्रमुखांची नियोजन बैठक घेतली. या बैठकीला जिल्हास्तरीय विभाग प्रमुख, तसेच ऑनलाईन स्वरुपात तालुक्यातून सर्व तहसिलदार व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

या पथदर्शी प्रकल्पांतर्गत प्रत्येक कार्यालय सुंदर करावे, सक्रिय सहभाग घेवून काम करावे,  आवश्यक भौतिक सुविधा पुरवाव्यात यातून प्रत्येक कार्यालयाला मानांकन दिले जाणार आहे. प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर तक्रार किंवा अभिप्राय देण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. तसेच काही कालावधीनंतर नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कार्यालयांची तपासणीही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. सेवा हमी अंतर्गत वितरीत करणाऱ्या योजनांसाठी या पथदर्शी प्रकल्पाद्वारे तीन प्रकारे काम करण्यात येणार आहे. यात सर्वांना सेवांची माहिती देणे, आवश्यक सेवांची निश्चिती करणे आणि सेवा म्हणजेच संबंधित दाखले वितरीत करणे यांचा समावेश आहे. सेवा केंद्राचे प्रतिनिधी दि.15 ऑगस्ट पासूनच निवडलेल्या गावांमध्ये व शाळा महाविद्यालयांमध्ये जाणार आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व प्रशासन विभाग प्रमुखांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा नोंदणी करावी हाही उद्देश या पथदर्शी कार्यक्रमाचा असणार आहे असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, सद्या फक्त 10 टक्केच लोकच ऑनलाईन पद्धने सेवा मागणीसाठी प्रक्रिया राबवतात. आपणाला ही टक्केवारी किमान 50 टक्क्यांवर न्यायची आहे. नागरिकांनी स्वत: नोंदणी करावी. स्वत:हून अर्ज करावेत हाही उद्देश आहे. यामुळे नव्या तंत्रज्ञानाची ओळखही त्यांना होईल. घरपोच सेवा देत असताना लोकांनी याही बाबत विचारणा केल्यास स्वागत असणार आहे. ज्या सेवा मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात किंवा ज्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात अडीअडचणी असतात तक्रारी असतात त्या योजनांवर या पथदर्शी प्रकल्पात विशेष लक्ष असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एकुण वेगवेगळ्या 473 सेवा शासनाकडून दिल्या जातात. त्यातील महत्त्वाच्या 100 सेवा सुरूवातीला घेतल्या जाणार आहेत. सेवांचे वितरण घरोघरी करीत असताना टोल फ्री क्रमांक व व्हॉट्स ॲप द्वारे लोकांना स्व:नोंदणीसाठी आवश्यक मदतही केली जाणार आहे.

0000

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!