*विधानसभेत परिवर्तन करुन कागलचा स्वाभिमानी बाणा दाखवा*
*राजे समरजितसिंह घाटगे*
*बामणीत केला गुणवंताचा सत्कार*
सिद्धनेर्ली,प्रतिनिधी.
येत्या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन करून कागलचा स्वाभिमानी बाणा दाखवा. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बामणी (ता.कागल) येथे गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नारायण पाटील होते.
यावेळी महापूर कालावधीत ट्रक चालकांची भोजन व्यवस्था केल्याबद्दल पांडुरंग भजनी मंडळ,गावचा पाणीपुरवठा सुरळीत केल्याबद्दल महावितरण, ग्रामपंचायत कर्मचारी, यांचा सत्कार केला.श्रेया पाटील, अथर्व कोईगडे, रेहान नदाफ,हर्षवर्धन मगदूम, शार्दुल बुवा,सुदेश पाटील,निखिल पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांसह लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मानधनातून मुलींची नावे ठेवणाऱ्या सरपंच अनुराधा पाटील यांचाही सत्कार केला.
घाटगे पुढे म्हणाले,सत्तेचे कोणतेही पद नसताना कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना हेलपाटे न मारावे लागता त्यांच्या दारात जाऊन विनासायास देत आहोत.ही कामे आणखी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आमदारकीची संधी द्या.
यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच अनुराधा पाटील,उपसरपंच रोहिणी कांबळे,कृष्णात बाबर,महादेव पाटील,अशोक पाटील, शिवाजी मगदूम,आनंदा कांबळे,वसंत कांबळे यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
‘शाहूं’चे आदर्श कागल अशी ओळख निर्माण करूया
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात झाला.मात्र काही कागलकरांना ते कागलचे आहेत हेच माहीत नाही. सोशल मीडियावर सर्च केल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या कागल ऐवजी राजकीय विद्यापीठ अशीच माहिती समोर येणे दुर्दैवी आहे.राजकीय विद्यापीठ ही ओळख बदलून छत्रपती शाहू महाराजांचे आदर्श कागल अशी ओळख निर्माण करूया.त्यासाठी तरुणाईने पुढे यावे असे आवाहन यावेळी श्री.घाटगे यांनी केले.त्यास तरुणांनी टाळ्यांच्या गजरांनिशी दाद दिली.
छायाचित्र बामणी येथे महापुराच्या पाण्यात जाऊन पाणी पुरवठा सुरळीत केलेल्या महावितरण व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सत्कारवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे शेजारी एम.पी.पाटील व इतर