शहाळे नारळ फोडण्यासाठीच्या उपकरणासाठी* *डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीला पेटंट*

Spread the news

*शहाळे नारळ फोडण्यासाठीच्या उपकरणासाठी*
*डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीला पेटंट*

तळसंदे
येथील डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्री महाविद्यालयाने तयार केलेल्या “टेंडर कोकोनट पंचिंग व स्प्लिटिंग मशीन” ला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून “डिझाईन पेटंट” मिळाले आले.

या मशीनमुळे शहाळे फोडण्यासाठी लागणारी शक्ती व त्यामध्ये इजा होण्याची शक्यता टळणार आहे. अत्यंत सुलभ पद्धतीने व कमी वेळात शहाळे नारळातील पाणी स्ट्रॉच्या सहाय्याने पिणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे. या मशीनचे बहुतांश भाग हे स्टेनलेस स्टीलने बनले आहेत. सर्वांना परवडेल अशी किंमत व वजनाने हलके असल्याने हे मशीन घरगुती तसेच व्यावसायिक पद्धतीने वापरणे शक्य असल्याचे प्रमुख संशोधक डॉ. सुहास पाटील यांनी सांगितले.

प्रा.(डॉ.) सुहास पाटील, डॉ. रणजीत पोवार, प्रा. अमोल गाताडे व प्रा. प्रदीप साबळे यांनी हे संशोधन केले आहे. या मशीनच्या वापरामुळे परिसरात कचरा होत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेत तसेच हॉस्पिटल शेजारी असलेल्या शहाळे विक्रेत्यांना याचा नक्कीच फायदा होइल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला.

पेटंट मिळवणाऱ्या संशोधकांचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष, आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सर्व संशोधक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!