स्वप्निल कुसाळे यास खासदार शाहू महाराज यांच्याकडून लाखाचे बक्षीस

Spread the news

 

स्वप्निल कुसाळे यास खासदार शाहू महाराज यांच्याकडून लाखाचे बक्षीस

 

कांबळवाडी ता. राधानगरी गावचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांनी पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव जगभर केले.

खासदार श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वप्नील याच्या कांबळवाडी ता. राधानगरी येथे घरी भेट देऊन आई-वडिलांसह परिवाराचा सत्कार केला. सोबत स्वप्निलला प्रोत्साहनपर एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात आले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक श्री अभिजीत तायशेटे,वसंत पाटिल बापु, सदाशिव चरापले, पांडुरंग भांदीगरे, रवी पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय चौगले, मिथुन पारकर, राकेश केरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!