टोलबाबत मोठा निर्णय काँग्रेसने दिला 25% टोला टोलमध्ये सवलत, काँग्रेसच्या आंदोलनाला यश

Spread the news

टोलबाबत मोठा निर्णय

काँग्रेसने दिला 25% टोला

टोलमध्ये सवलत, काँग्रेसच्या आंदोलनाला यश

 

, कोल्हापूर

जोपर्यंत पुणे ते कोल्हापूर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत पंचवीस टक्के टोल सवलत, वीस किलोमीटर अंतरावरील वाहनधारकांना शंभर टक्के सवलत देण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याची लेखी ग्वाही दिल्यानंतर काँग्रेसने चार तासानंतर आंदोलन मागे घेतले. दरम्यान, रस्ते दुरूस्त होईपर्यंत टोलमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुणे ते कोल्हापूर महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे रस्ते दुरूस्त होईपर्यंत टोल आकारणी करू नये या मागणीसाठी किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राजू आवळे, जयंत आसगावकर, जयश्री पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.  सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हे आंदोलन करण्यात आले. तासभर रस्त्यावरील वाहतूक अडविण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या.

देणार नाही, देणार नाही, टोल आम्ही देणार नाही अशा घोषणा देत सकाळी हे आंदोलन सुरू करण्यात आले. वाहनधारकांनी टोल देऊ नये, वाहनधारकांकडून टोल आकारणी करू नये अशी मागणी करत हे आंदोलन सुरू झाले. किणी टोल नाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. आंदोलन काळात संबंधित ठेकेदाराने टोल वसुली बंद ठेवली होती. दुपारपर्यंत सवलत देण्याबाबत निर्णय होत नव्हता. यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्ता अडवला.  त्यानंतर प्रकल्प संचालक वसंत पंदूरकर यांनी पंचवीस टक्के सवलत देण्यास मान्यता दिली. याशिवाय टोल नाका परिसरातील वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहनधारकांना टोल न आकारण्याचेही ठरले. रस्ते दुरूस्त होईपर्यंत टोलमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन पंदूरकर यांनी दिले.

या आंदोलनात माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचीन चव्हाण, राहूल पाटील, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, राहूल खंजिरे, माजी नगरसेवक मोहन सालपे, तौफिक मुलाणी, शशीकांत खोत, भारती पोवार, वैशाली महाडिक, बसवरावआजरी, दिग्विजय कुराडे, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, उदय पोवार, अक्षय शेळके, दुर्वास कदम, शिवाजी कवठेकर, प्रकाश पाटील, सुयोग वाडकर, दिग्वीजय मगदूम, तानाजी जाधव, माजी सरपंच संग्राम पाटील, शशीकांत खवरे, शिवाजीराव पाटील, सर्जेराव माने शाहू काटकर, सागर कोंडेकर, विनायक घोरपडे, चंदा बेलेकर, संजय वाईकर, भगवान जाधव, शिवाजीराव जाधव, सुभाष जाधव यांच्यासह  अनेक मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!