आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध इंडिया आघाडी कोल्हापूर* 

Spread the news

*आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध

इंडिया आघाडी कोल्हापूर*

 

कोल्हापूर

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात आपल्या मतदारसंघात फिरत असताना अचानकपणे काही तरुणांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर निषेध  करण्यात आला.

 

विशाळगड दंगली संदर्भ आपले प्रखर मत व्यक्त केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे संस्कृत दर्शनी दिसत आहे. स्वराज्य पक्षाने हल्ला केल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये दिसून येत आहे. परंतु हा हल्ला नुसता विशाळगडा बाबतचा नसून हा एकंदरीत लोकशाही वरचा हल्ला आहे. नेमका हा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना कोणत्या दिशेने घेऊन जावयाचा आहे हा मूळ प्रश्न आहे या हल्ल्या पाठीमागे नुसता स्वराज्य पक्ष व विशाळगड घटना नसून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा दंगलीच्या घटना घडवून आपल्या पदरात काय पडते का हे पाहण्याचाच एक प्रयत्न आहे या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे ओळखून येत आहे असा आरोप यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला.

आमदार जितेंद्र आव्हाड हे  शाहू फुले आंबेडकर या विचारावर निष्ठा असणारा व छत्रपती शिवरायांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा व शरद पवार यांचा खंदा समर्थक आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्रात ते वावरत आहेत असे असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जे काही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये कदापही अशा प्रवृत्तींना यश येणार नाही.  महाराष्ट्र मध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही लोक जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन जाती धर्मामध्ये भेद निर्माण होऊ नये म्हणून शांत बसावे असे आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले. इंडिया आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या निषेध पत्रकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश संघटक सचिव विनय कदम, काँ. दिलीप पवार, माकप राष्ट्रीय समिती सदस्य काँ.प्रा. सुभाष जाधव, भाकप जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, आप आदमी पार्टीचे प्रदेश सचिव संदीप देसाई व शहर महासचिव अभिजीत कांबळे, काँग्रेस पक्षाचे भरत रसाळे, सीपीआयएमसीचे विवेक गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा पक्षाचे  विजयराव देवणे, राष्ट्रवादी भुदरगडचे दत्तात्रय गुरव यांच्या सह्या आहेत.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!