महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व केंद्र शासन संयुक्तरित्या राज्यभर कौशल्य विकास अभियान राबवणार – अतुलकुमार तिवारी*  ——————————— महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील 15000 युवकांना यावर्षी कौशल विकास प्रशिक्षण

Spread the news

*महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व केंद्र शासन संयुक्तरित्या राज्यभर कौशल्य विकास अभियान राबवणार – अतुलकुमार तिवारी*
———————————
महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील 15000 युवकांना यावर्षी कौशल विकास प्रशिक्षण
———————————-
मुंबई: देशाच्या व राज्याच्या विकासासाठी कौशल्य विकास महत्वाचा आहे. कौशल्य विकास शहरासह ग्रामीण स्तरांवरही होणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य विकासाच्या अनेक योजना असून सर्वसाधारण शिक्षण व कौशल्य यांना समकक्ष असणे महत्वाचे आहे. त्यामुळे श्रमालाही महत्व असते हे जाणवेल. यादृष्टीने कौशल्य विकासाच्या योजना असून नव्या शैक्षणिक धोरणातही त्याला स्थान आहे. महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेऊन हे कार्य हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रिय कौशल्य विकास व उद्योजकता सचिव अतुलकुमार तिवारी यांनी दिले.  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योजक व कौशल विकास मंत्रालय संवाद परिषद परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने जे विकासोन्मुख कार्य गेल्या नऊ दशकात केले आहे आणि त्याअनुषंगाने चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जे कार्य हाती घेतले आहे त्याबद्दल कौतुक करून केंद्र शासन व महाराष्ट्र चेंबर संयुक्तपणे महाराष्ट्रात कौशल्य विकास अभियान राबविणार आहे असे सांगितले.

सुरवातीला उपस्थितांचे स्वागत करून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची ऐतिहासिक ओळख करून दिली. अलीकडच्या काळात  राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ व तरुणांना शिक्षण आधारित रोजगार मिळावा यासाठी बिझनेस सोल्युशन पॉलीक्लिनिक या उपक्रमांतर्गत १८ हजार विद्यार्थ्यांना उद्योगात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या मार्गदर्शन व सहकार्याने संपुर्ण राज्यात कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जातील अशी माहिती दिली.यावर्षी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पंधरा हजार युवकांना कौशल विकास प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामध्ये कोल्हापूरसाठी पंधराशे युवकांसाठी जागा निश्चित केल्या असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.

*राज्याचे कौशल्य विकास प्रयत्न* याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास आयुक्त श्रीमती निधी चौधरी यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यासंदर्भात माहिती दिली. त्याचप्रमाणे आयटीआय केंद्रांमध्ये केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे आवश्यक असे कौशल्य तरुण तरुणींना मिळू शकेल असे सांगितले. उद्योजकांनी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या
औद्योगिक संस्थांनी
कौशल्य विकास योजनांमध्ये भागीदार होऊन सहकार्य करावे असे आवाहन केले.

नाशिक विभाग महसूल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी शिक्षण व कौशल्य विकास यामध्ये जो फरक आहे तो भरून निघणे आवश्यक आहे असे सांगून  सर्वानी एकत्र येऊन काम करावे असे सुचविले.
नाशिकमध्ये कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण असून नाशिक येथील कार्य आणि केंद्र हे पथदर्शी म्हणून करूयात असे आवाहन केले.  त्यापासून बोध घेऊन संपूर्ण देशात असे कार्य त्यातून उभे राहील असेही ते म्हणाले.

क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या. तसेच क्रेडाईमार्फत कुशल मनुष्यबळ उभे करत असलेल्या संदर्भात राबविलेल्या उपक्रमांची उपक्रमांची माहिती दिली.

*समन्वय बैठक* नवे शैक्षणिक धोरण आणि कौशल्य विकास संदर्भातील केंद्र सरकारचे धोरण या अनुषंगाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चर या शिखर संस्थेच्या वतीने केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या मध्ये विचार विनिमय चालू होता.

व्यापार उद्योग सेवा आणि इतरही क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ पुरवता यावे यादृष्टीने संबंधित संस्थांच्या सहकार्याने समन्वय बैठका घेण्याबाबत ठरले होते. त्याची सुरवात नाशिक येथे शासन आणि व्यापार, उद्योग, सेवा, कृषी व अन्य संस्था यांची बैठक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर यांच्या पुढाकाराने झाली. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव अतुलकुमार तिवारी व महाराष्ट्र कौशल्य विकास आयुक्त श्रीमती निधी चौधरी, नाशिक महसूल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये झाली. हॉटेल एसएसके सॉलिटिअर येथे झालेल्या या बैठकीला केंद्र आणि राज्य सरकारातील मिळून २० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर समन्वय बैठकीचे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, केंद्रिय कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव अतुलकुमार तिवारी, महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम आणि महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्षा सौ. संगीता पाटील, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, महाराष्ट्र चेंबर विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, जितेंद्र  ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार उपस्थित होते. कृणाल पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रामाशिष भुतडा यांनी केले. तसेच सिआयआयचे प्रतिनिधी सुधीर मुतालिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभारप्रदर्शन  डॉ. सचिन गुळवे यांनी मानले.

या समन्वय सभेला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, sambhajinagar कोल्हापूर, पुणे, सांगली, नाशिक आदी भागातील महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*फोटो कॅप्शन – कौशल्य विकास आणि उद्योजक परिषदेत मार्गदर्शन करतांना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुलकुमार तिवारी. महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्षा सौ. संगीता पाटील.*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!