शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी उपक्रम
कोल्हापूर :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा संघटिका माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तरे यांनी ‘घरोघरी महिला शिवसैनिक’ उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
राजारामपुरी शाखेच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य कर्मचारी व ली ज्येष्ठ नागरिकांना महेश उत्तूरे, शिवसेनेचे नी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, रिमा देशपांडे, मंजीत माने, युवा सेना विस्तारक विशाल विचारे, सनी शिंदे यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले.
तसेच राजारामपुरीतील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सदस्यांना रेनकोट किट व छत्र्या वाटप करण्यात आल्या. यावेळी किरण पडवळ, राजू जाधव, राकेश पाटील, सुशील भांदिगरे, दिनेश परमार, सागर साळुंखे, रवी साळुंखे, स्वरूप मांगले, शैलेश पुणेकर, शिवराज जाधव, महेश कोरवी, आर्यन मंगुडकर, भरत रजपूत, बाळूमामा विकास मंचचे सदस्य, महानगरपालिका कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळू दे म्हणून अंबाबाईला अभिषेक घालण्यात आला.
कोल्हापूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्य वाटप करताना प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, विजय देवणे, रघुनाथ टिपुगडे आदी.