- जयसिंगपूर ता.२५: महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यात पुराची परिस्थिती येते आहे.या महापूरातून महाराष्ट्रला सावरण्यासाठी जागतिक बँकेकडून देण्यात आलेल्या पॅकेज बरोबरच केंद्र शासनाने ही आणखीन निधी द्यावा अशी मागणी हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज संसदेच्या अधिवेशनात केली.
गेल्या चार पाच दिवसां पासून चाललेल्या केंद्रीय बजेट अधिवेशनामध्ये आज खासदार धैर्यशील माने यांनां बोलण्याची संधी मिळाली.या मद्ये बोलताना त्यांनी सांगली – कोल्हापूर जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्राला पुराचा धोका निर्माण झाल्याचे सांगितले.या तून सावरण्यासाठी विविध उपयोजना करणे गरजेच्या आहेत.त्या साठी जागतिक बँकेने तीन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले असल्याचे सांगत केंद्रानेही आणखीन निधी द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने पूरबाधित क्षेत्राचे संरक्षण होणार आहे.
बोलताना त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघतील विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत झालेला उद्रेक सांगत महाराष्ट्रतील गड किल्ले हॆ महाराष्ट्राचे सौंदर्य,महाराष्ट्राचे भूषण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यावर कोणतीही अतिक्रमणे होऊ नयेत, झालेली अतिक्रमणे काढण्यात यावीत अशी मागणी करीत केंद्र शासनाने लक्ष देऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची गडकिल्ल्यावर देखरेक ठेवावी अशी मागणी केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकडून टीका सुरु आहे. या अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्रप्रदेश ला जास्त निधी मिळाला असून महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल विरोधी पक्षातील नेते उपस्थित करत आहेत. मात्र खासदार धैर्यशील माने यांनी हा अर्थसंकल्प देशाला पुढे घेऊन जाणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याचे सांगत सर्वात लहान व कमजोर असणाऱ्या मुलावर आई सर्वाधिक प्रेम करते अस म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
खासदार माने यांनी संसदेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली, अर्थसंकल्प पूर्वीच महाराष्ट्राला केंद्राने 76 हजार कोटी रुपये दिलेत, आता तर विरोधी पक्ष हारून सुद्धा जल्लोष मध्ये आहे, सत्तेत येण्यासाठी आम्हाला जास्त लोकांपर्यंत जावं लागलं नाही मोदी यांची गॅरंटी चालली आहे म्हणूनच मोदी सरकार आलं आहे. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लागवला. केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये तरुण, शेतकरी आणि विध्यार्थ्यांसाठी केलेल्या तरतुदी सांगत माने यांनी सांसदेतील भाषण गाजवले .