विवेक ”  वार्षिक विद्यार्थ्यांच्या लेखनगुणांना व्यासपीठ मिळवून देते                               मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था,कोल्हापूर                                                                                  विवेकानंद मध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशन

Spread the news

विवेक ”  वार्षिक विद्यार्थ्यांच्या लेखनगुणांना व्यासपीठ मिळवून देते

                              मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था,कोल्हापूर

विवेकानंद मध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशन”

कोल्हापूर दि. 23 :  विवेक वार्षिक नियतकालिक हे महाविद्यालयाचा आरसा आहे.  महाविद्यालयाच्या विविध विभागाचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसते.  तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लेखन कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम विवेक नियतकालिक करीत असते.  शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत सातत्याने विवेक नियतकालिक अग्रक्रमावर राहिले आहे.  दरवर्षी विवेक अंकाची निर्मिती  साहित्य, फोटोग्राफी , कलात्मक मांडणी यामुळे  दर्जेदार असते.  याही वर्षी विवेक या अंकाची निर्मिती दर्जेदार झालेली आहे.  असे प्रतिपादन  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी येथील विवेकानंद कॉलेजच्या विवेक 2023-24 या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.  यावेळी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या विवेक अंकाचे प्रमुख संपादक  डॉ. एकनाथ  आळवेकर हे होते, तसेच विभागीय संपादक म्हणून डॉ.कविता तिवडे, डॉ.आरिफ महात, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. टेकचंद गौपाले, डॉ.सलमा नदाफ, प्रा अशोक पाटील, प्रा एस एस जगताप, प्रा विश्वंभर कुलकर्णी, प्रा एस एस कुंडले, प्रा. राहुल इंगवले यांनी काम पाहिले. या अंकाच्या निर्मितीसाठी ज्युनिअर, सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग यांचे बहुमोल सहकार्य लाभले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!