अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर नेणारा .

Spread the news

 

अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर नेणारा

खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

 

आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेला वेगाने मुर्तस्वरूप देण्यासाठी आजचा केंद्रीय अर्थसंकल्प महत्वाचा आहे.

शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, उद्योजक आणि गोरगरीबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रूपयांची तरतुद म्हणजे देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहे. तर शेतकर्‍यांनाही या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार, कौशल्य विकास, शिक्षण, शहरीविकास, गरीबांसाठी घरकुल, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्यांक मागास घटकांचा विकास अशा सर्व मुद्दयांचा समावेश असलेला मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर नेणारा आहे.

श्री.धनंजय महाडिक,
खासदार, राज्यसभा


Spread the news

You may also like

error: Content is protected !!