Spread the news

कमिशन साठी आमदारांनी १० वर्षात किती संपत्ती जमा केली हे संपूर्ण जनतेला माहित: के पी पाटील
गारगोटी प्रतिनिधी राजेंद्र यादव
मतदार संघाचा विकास करण्यासाठी नव्हे तर स्वतः चे कमिशन मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या दहा वर्षांत किती संपत्ती गोळा केली हे जनता जाणून आहे . पालीच्या डोंगरासह अन्य ठिकाणी शेकडो एकर जमीन घेऊन व स्थावर मालमत्ता उभारून कामाच्या टक्केवारी बरोबरच भागीदारीने कामे करून हजारो कोटींची कमाई केली असे प्रतिपादन आज के पी पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना केले
आमदार प्रकाश आबिटकर यांनी मेळाव्यात केलेल्या आपल्या टिकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
पाटील म्हणाले की,बिद्रीचा आदर्श कारभार संपूर्ण राज्यभर पोहचविलेला आहे.त्याचा नाव लौकिक झाला आहे.
याच इर्षे पोटी आबिटकर सातत्याने कारवाई करत असतात.
या आधी ही त्यांनी अनेकवेळा खोट्या अफवा पसरवून बिद्री कारखान्याचे नाव बदनाम केले आहे .
माञ निवडणुकीत बिद्री कारखान्याचे सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.
सर्वाधिक ऊसदर देणारी अशी बिद्री ची ख्याती असताना अशा संस्थेच्या प्रकल्प उभारणी मध्ये वत्यय निर्माण करण्या बरोबरच कारवाई करण्याचे काम ते सत्तेच्या दबावातून करत आहेत .
त्यांच्या सांगण्यावरून च अश्या कारवाई होत असतात.
पुन्हा तो मी नव्हेच अशी ते भूमिका घेत असतात.
स्वतःच्या स्वार्थासाठी गुवाहटीला जाणाऱ्या आमदारांनी किती माया मिळवली हे जनतेला माहित आहे .
परंतु एवढ्याने ही पोट न भरलेल्या आमदारांनी कमिशनचा धंदा च चालू केलेला आहे.
जादा कमिशनच्या हावस ने मतदार संघाच्या बाहेरील कॉन्ट्रॅक्ट दारांना कामाचा ठेका दिला आहे .
त्यांना कामाच्या दर्जाविषयी काहीही देणघेणे नसून फक्त टाक कमिशन घे परमिशन हेच धोरण आमदारांनी अवलंबिले आहे अशी खोचक टीका ही त्यांनी या वेळी केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!