मतदार यादीचे व मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण योग्य पद्धतीने करा – भाजपा कोल्हापूरच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन

Spread the news

8मतदार यादीचे व मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण योग्य पद्धतीने करा – भाजपा कोल्हापूरच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर दि. १९ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना कोल्हापूर उत्तर विधानसभामध्ये येणाऱ्या १००० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढवावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने ‘जे मतदान केंद्र 1500 मतदार संख्या असलेले केंद्र आहे त्या मतदारांची संख्या 1000-1200 करण्यात येऊन त्याच ठिकाणी Location change न करता त्याच ठिकाणी ‘अ’ आणि ‘ब’ त्याच इमारतीमध्ये करण्यात यावे अशा स्वरुपाची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
याच विषयात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा शिष्टमंडळाने मतदान केंद्रांविषयी सखोल माहिती घेतली असता आणखीन त्रुटी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे यांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
आजच्या या निवेदनामध्ये, मतदारांची संख्या कमी करतेवेळी ज्या मतदान केंद्रात मतदारांची संख्या 800-900 असेल व दुसऱ्या मतदान केंद्रात तीच मतदारांची संख्या ही 1400-1500 पर्यंत असेल त्या ठिकाणचे 200 मतदारांची संख्या कमी करुन ही ज्या मतदान केंद्रावर 800-900 मतदार आहेत त्या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे. परिणामी एकाच वसाहतीतील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात गेल्याने मतदानाच्या दिवशी मतदाराला आपले मतदान केंद्र शोधण्यास अडचण निर्माण होईल, मतदार यादीतील काही भाग तोडून नवीन मतदान केंद्र तयार करणे म्हणजे मतदाराला संभ्रमात टाकणे होईल, त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर सुध्दा होऊ शकतो. परिणामी जे मतदान केंद्र 1500 मतदारसंख्येपर्यंत आहे ते 1000-1200 पर्यंत कमी करुन त्याच इमारतीमध्ये ‘अ’ आणि ‘ब’ असे वर्गीकरण करुन कोणत्याही प्रकारे Rationalization या नावाखाली मतदारावर याचा परिणाम होणार नाही याची खात्री मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून आम्हाला मिळावयास हवी.
त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीला फक्त दोन ते तीन महिने शिल्लक असताना अशाप्रकारे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्राच्या Rationalization च्या नावाखाली मतदार यादीचा भाग तोडणे, मतदारांना निवडणुकीच्या वेळी गैरसोय निर्माण होईल अशी व्यवस्था निवडणूक आयोग करत आहे की काय, अशी शंका निर्माण होणे या सर्व बाबी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
तरी Polling stations having more than 1500 electors shall be Rationalize as per given the schedule before the draft publication of electors role in accordance with instructions content in manual on polling station 2020. या अनुषंगाने मतदान केंद्राची संख्या विधानसभानिहाय वाढविणे अथवा Auxiliary करण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन मतदान केंद्राचे Rationalize करतेवेळी कोणत्याही प्रकारे अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची यादी तोडून ती दुसऱ्या मतदान केंद्रावर टाकण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्याच ठिकाणी ‘अ’ आणि ‘ब’ अशा वर्गवारीमध्ये मतदान केंद्र त्याच इमारतीमध्ये मंजूर करावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदाराची मतदान करतेवेळी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

तसेच दि.01.07.2024 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदान केंद्राच्या Rationalization बाबत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्हा स्तरावर अनेक मतदान केंद्रांमध्ये मतदार यादीचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हयामध्ये ६० ज्यादाचे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेमध्ये ज्यादाचे ४ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु हि ज्यादा तयार करण्यात आलेली मतदान केंद्रे त्याच भागात असणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून मतदाना दिवशी मतदारांची गैरसोय होता कामा नये.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, चंद्रकांत घाटगे, दिलीप मेत्राणी, शैलेश पाटील, रविकिरण गवळी, धीरज पाटील ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!