‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…
कोल्हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमिताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ ता. करवीर येथे पायी दिंडी निघत असते. या दिंडीमध्ये कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. या पायी दिंडीचे औचित्य साधून आज दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने ५००० सुगंधी दूध पिशवी तसेच खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन मा.अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी संपदा थोरात, संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदि उपस्थित होते.
—————————————————————————————————-
फोटो ओळ – यावेळी सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठाचे वाटप करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदि