बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यासाठी कोल्हापुरातून पाच हजार कार्यकर्ते जाणार* *राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांची माहिती* *मेळाव्याच्या नियोजनासाठी झाली कोल्हापुरात बैठक*

Spread the news

“*बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यासाठी कोल्हापुरातून पाच हजार कार्यकर्ते जाणार*

*राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांची माहिती*

*मेळाव्याच्या नियोजनासाठी झाली कोल्हापुरात बैठक*
*कोल्हापूर, दि. १२:*
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे रविवारी दि १४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनसन्मान मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजारावर कार्यकर्ते स्वखर्चाने जाणार असल्याची माहिती, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी दिली. या मेळाव्याला जाण्याच्या नियोजनासाठी कोल्हापुरात आयोजित कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. पाटील-आसुर्लेकर बोलत होते. या मेळाव्याला कोल्हापुरातून मोठ्या संख्येने जाऊन मेळावा यशस्वी करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, महाराष्ट्रात महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसह लेक माझी लाडकी, कृषीपंपांना मोफत वीज, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी फी माफी इत्यादी योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.

*महायुती सरकारचे अभिनंदन……!*
गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसनराव चौगुले यांनी मांडलेल्या महायुती सरकारच्या अभिनंदनाच्या ठरावाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. महायुती सरकारने राज्यात राबविलेल्या लोककल्याणकारी विशेषता माता -भगिनी, शेतकरी व युवक कल्याणाच्या विविध योजनांबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.

गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसनराव चौगुले, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे, शहराध्यक्ष आदिल फरास यांची मनोगते झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, युवक जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, रणवीरसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष श्रीमती रेखा आवळे, इचलकरंजी कार्याध्यक्ष अमित गाताडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष शिरीष देसाई, प्रदेश युवक सरचिटणीस अभिषेक डोंगळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष संभाजीराव पवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भिकाजी एकल, बाजार समितीचे माजी संचालक नानासाहेब पाटील, बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, नगरपालिका कर्मचारी संघटना अध्यक्ष सुभाष मालपानी, भुदरगडचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील- भुयेकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील कांबळे, दक्षिण कोल्हापूरचे तालुकाध्यक्ष पोपट रणदिवे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे, सौ. जाहिदा मुजावर, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, उत्तम कोराने, महेश सावंत, प्रसाद उगवे आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे यांनी मानले.
…………..

*कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर. यावेळी उपस्थित प्रताप उर्फ भैया माने, प्रा. किसन चौगुले, अनिल साळोखे, रणवीरसिंह गायकवाड, सुधीर देसाई व प्रमुख मान्यवर.*
=========≈==


Spread the news

You may also like

error: Content is protected !!