Spread the news

 

 

बायोलॉजीचे विद्यार्थी आता अभियांत्रिकीला पात्र.
१२ वी च्या फक्त ‘ग्रुप-बी’ च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी.

कोल्हापूर ,प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २४-२५ पासून १२ वीला ‘ग्रुप-बी’ (पी.सी.बी.) म्हणजेच फक्त बायोलॉजी (जीवशास्त्र) ग्रुप असणारे विद्यार्थी आता अभियांत्रिकीला सुद्धा पात्र होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या २०२४-२५ च्या पदवी व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकातील क्र.७ च्या पात्रता निकषांच्या संदर्भाने ज्या १२ वीच्या बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाची ची सामायिक प्रवेश परीक्षा (सी.ई.टी) दिली आहे तसेच केंद्र शासनाची ‘नीट’ ची परीक्षा दिली असेल अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थेट संधी दिली जाणार आहे. यामुळे मेडिकल,फार्मासी अशा प्रवेश परीक्षांना ज्यांनी अर्ज केलेले आहेत अशा हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय आता उपलब्ध होणार आहे. भविष्यात अशा सर्व विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ,एग्रीकल्चर इंजिनिअरिंग, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी,पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजीनियरिंग ,प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.
याबाबतचा तपशील लवकरच महाराष्ट्र शासनाकडून घोषित केला जाईल. तत्पूर्वी संबंधित विद्यार्थी, पालकांनी या सुवर्णसंधीचा उपयोग करून १० जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वतःची नोंदणी करावी व अभियांत्रिकीचा पर्याय स्वतःसाठी उपलब्ध करून घ्यावा असे आवाहन येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी सर्व पालक व विद्यार्थ्यांना केले आहे .केआयटीमध्ये दि.१० जुलै २४ पासून विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन,कागद पत्रांची तपासणी/ छाननी व ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे कोल्हापूर,सांगली,सातारा,कोकण परिसरात फक्त केआयटी मध्ये २२ वर्षांची परंपरा असलेला ‘बायोटेक्नॉलॉजी इंजीनियरिंग’ हा कोर्स आता १२ वी च्या फक्त ग्रुप बी असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!