दिव्यांग विद्यार्थ्यांना मालोजीराजे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the news

दिव्यांग विद्यार्थ्यांना मालोजीराजे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

कोल्हापूर
दसरा चौक येथील अपंग पुनर्वसन संस्थेतील गुणवंत व गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी दिव्यांगत्वाचा न्यू न्यूनगंड न बाळगता त्याच्यावर मात करत यश संपादन करावे असे आवाहन करतानाच मालोजीराजे यांनी असे यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यार्थ्यांना सर्व सरकारी योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पायमल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर मालोजीराजे यांच्या हस्ते 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव बापूराव चौगुले यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास अजय वनकुंद्रे, वसंत कांबळे, विकास मोरस्कर, दत्तात्रय महामुलकर, सुधाकर पाटील, संजय पाटील, उमा पवार, प्रल्हाद मोरे, दिलीप वाईंगडे, पांडुरंग देवणे, शोभा सावंत, प्रियंका कुराडे, चेतन अनुसे, मनोहर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!