शुभांगी हेरवाडे म्हणजे त्याग, संयम, उदारता आणि दातृत्वाचा संगम
कोल्हापूर
त्याग, संयम, उदारता आणि दातृत्व अशा गुणांचा संगम म्हणजेच शुभांगी प्रभाकर हेरवाडे होय असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी काढले.
आर. के. वालावलकर प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका शुभांगी प्रभाकर हेरवाडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त त्यांचा प्राचार्य लवटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लवटे यांनी हेरवाडे यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया होते.
प्राचार्य लवटे म्हणाले, तेज हे कर्तृत्व अथवा पदांनी कधी उजळून निघत नाही. त्याला समाजधनाची पावती आवश्यक असते. हेच समाजधन हेरवाडे कुटुंबाला मिळाले.
लोहिया म्हणाले, प्रभाकर हेरवाडे आमच्या संस्थेसाठी पूर्ण वेळ देत आहेत. अशा वेळी संसाराची संपूर्ण जबाबदारी शुभांगी हेरवाडे पेलत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम आणि दातृत्व कौतुकास्पद आहे. आजही त्या समर्थपणे पतीला सात आणि वेळ देत आहेत. पतीला सामाजिक कामासाठी वेळ देणारी पत्नी मिळणे आवश्यक आहे. अशी पत्नी शुभांगी यांच्या रूपाने प्रभाकर हेरवाडे यांना मिळाली आहे.
प्रारंभी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव एस. एस. चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, प्राचार्य जी.पी. माळी, प्रभाकर हेरवाडे , मंजुषा वायफळकर, लीना जोथे, आसावरी पुजारी, तीर्था टिंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्राचार्य बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य प्रवीण चौगुले, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, प्रा. टी. के. सरगर, सी.एम. गायकवाड, राजेंद्र खानविलकर, प्रदीप पवार, पी. बी. पाटील, कोजिमाशीचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड, भाग्यश्री कासोटे भीमराव हेरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शितल हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.