???? *महावितरणच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा औद्योगिक असोसिएशन्स कडून सत्कार* …
—————————
▪️ *कोल्हापूर [ विद्युत भवन, ताराबाई पार्क ]* : महाराष्ट् राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., कोल्हापूर येथे मुख्य अभियंता म्हणून स्वप्नील काटकर आणि अधिक्षक अभियंता पदी जी. एम. लटपटे हे नुकतेच रूजू झाले.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल स्मॅक, केईए, गोशिमा, मॅक या औद्योगिक असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी या सर्व औद्योगिक संघटनांबद्दल तसेच औद्योगिक क्षेत्रामधील कामकाजाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात एमएसएमईचा सध्याचा सर्वात मोठा गढ कोल्हापूर विभाग आहे, येथे सर्वाधिक उद्योगधंदे आहेत यामध्ये फाउंड्री आणि इंजिनिअरिंग, वस्त्रोद्योग व इतर उद्योगांचा समावेश आहे. कोल्हापूरा मधील स्थानिक उद्योजक येथे कार्यरत आहेत, या सर्वांनी स्वकष्टावर प्रगती साधत उद्योगांना मोठे केले असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की देशात असा कुठलाही वाहन उद्योग नसेल ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा या विभागातील फाउंड्री आणि इंजिनियरिंग मशीन क्षेत्रातील कास्टिंग वापरले गेले नसेल. ट्रॅक्टर, ट्रक, एसयुव्ही, काही प्रमाणात कार्स, दुचाकी निर्मिती मध्ये मुख्यत्वे इथलेच कास्टिंग असते. देशात सर्वात केंद्रित फाउंड्री आणि इंजिनियरिंग ही प्रमुख संकल्पना कोठे असेल तर ती कोल्हापूरा मध्ये आहे.
महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल मध्ये वीज गळतीचे प्रमाण फार कमी आहे तसेच वीज देयक ही वेळेवर अदा केली जातात, महावितरण कडून सुद्धा उद्योग क्षेत्राला नेहमीच सहकार्याची भूमिका असते याबद्दल जैन यांनी महावितरणचे कौतुक केले.
उद्यमनगर मध्ये अंडरग्राउंड वायरिंग करणेचे काम अद्यापी प्रलंबीत आहे तसेच शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅन ची सुविधा बंद आहे या दोन्ही बाबतीत मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली.
महावितरणच्या या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी या चारही औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले व येता काही दिवसात असोसिएशना भेट देणार असले बाबत ते म्हणाले.
या प्रसंगी बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, नितीनचंद्र दळवाई, राजू पाटील, अतुल पाटील, संजय देशिंगे, कार्यकारी अभियंता शहर सुनिल माने [शहर], कार्यकारी अभियंता अभिजीत सिकणीस [प्रशासन], प्रदीप व्हरांबळे, कृष्णात सावंत इ. उपस्थित होते.