‘डी.वाय.पाटील’ पॉलिटेक्निकमध्ये सूजलॉन कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू
कसबा बावडा
येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये सूजलॉन ग्लोबल सोल्युशन्स या कंपनीच्या पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील नऊ पॉलिटेक्निक आणि डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा, तळसंदे डिग्री आणि पॉलिटेक्निक, संजय घोडावत पॉलिटेक्निक ,के.पी.पाटील पॉलिटेक्निक,अशोकराव माने पॉलिटेक्निक , सातारा पॉलिटेक्निक, ज्ञानेश्वर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट सातारा येथील मेकॅनिकल ,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात आली.
यावेळी सुजलॉनचे मनुष्यबळ विकास अधिकारी सुधाकर पाटील, एरिया हेड संजय शेटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी सांगितले की, पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सुजलॉन सारख्या नामांकित कंपनीमध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरला चांगली दिशा मिळेल.
यावेळी उपप्राचार्य नितीन माळी , रजिस्ट्रार महेश रेणके यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले .