शाहू विचारांचे अनुकरण करण्यासाठी क्रियाशील व्हा पन्नालाल सुराणा यांचे आवाहन

Spread the news

शाहू विचारांचे अनुकरण करण्यासाठी क्रियाशील व्हा

पन्नालाल सुराणा यांचे आवाहन

 

कोल्हापूर

शांततेच्या मार्गाने लोकशाही टिकवून विकास साधताना शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्यासाठी क्रियाशील व्हा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.

कोल्हापुरातील रा. शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने पत्रकार सुराणा यांना रा. शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के होते.

सत्काराला उत्तर देताना सुराणा म्हणाले, शाहू महाराजांची विचार चांगले आहेत असे कौतुकाचे फक्त उद्गार काढण्याऐवजी त्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आज अपप्रवृत्ती आणि हिंसाचार वाढत आहे. अशावेळी कुणीतरी या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस करायलाच हवे.

प्रारंभी प्रा. अशोक चौसाळकर यांनी स्वागत व प्रास्तावित केले. ट्रस्टच्या सचिव मोहिनी चव्हाण यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. ट्रस्टचे विश्वस्त राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!