कोल्हापूर : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रक्रिया या विषयावर सोमवारी दहा जून 2024 रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव दीपक चौगुले व संचालक मोहन वनरोटी यांनी केले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, महत्त्वाची कागदपत्रे, शिष्यवृत्ती, आरक्षण, शासकीय नियम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम मोफत आ.हे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. या कार्यक्रमात सामील होऊन इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी. प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्यावी व ऑप्शन फॉर्म भरताना होणारा गोंधळ टाळावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम सर्व संबंधित विषयांच्या शंकांचे निरसन करेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची असते. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पत्रकार परिषदेला प्राध्यापक अमित वैद्य उपस्थित होते.