Spread the news

 

डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समितीमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन

 

– अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जी. पी. माळी व सचिव विश्वास सुतार यांची माहिती

कोल्हापूर

ज्येष्ठ साहित्यिक संशोधक प्राचार्य सुनील कुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जीपी माळी व सचिव विश्वास सुतार यांनी पत्रकार बैठकीत दिली. लवटे सरांच्या सामाजिक, वाङ्मयीन, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य माळी यांनी सांगितले की प्राचार्य लवटे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ पार पडला त्यानंतर त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय नियोजन समितीने घेतला वर्षभर यासाठी अनेक उपक्रमही निश्चित करण्यात आले या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली या बैठकीस आपल्यासह विश्वास सुतार , प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. टी. के. सरगर, प्रा. सी. एम. गायकवाड, संजय कळके, सागर बगाडे, प्रा. जॉर्ज क्रुझ, अमेय जोशी, विजय एकशिंगे, दीपक जगदाळे, अमेय जोशी, भाग्यश्री कासोटे आदी उपस्थित होते.

लवटे सरांच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा कॉलेज सह सर्व क्षेत्रातील योगदानातून वर्षभर हे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये व्याख्यान परिसंवाद ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ प्रकाशन स्पर्धा यांचा समावेश आहे.

अमृत महोत्सव समितीमार्फत वर्षभरात चार कार्यक्रमांचे नियोजन :

1) रविवार, दि. 23 जून 2024 रोजी व्याख्यान
वक्ते : मा.डॉ. विवेक सावंत (चीफ मेंटर, एमकेसीएल फाउंडेशन)
विषय : कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजे व मानव
संभाव्य अध्यक्ष : विनोदकुमार लोहिया
ठिकाण : राम गणेश गडकरी सभागृह, दि. न्यू. एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
वेळ : सायंकाळी 4.00 वाजता

2) रविवार, दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी व्याख्यान
वक्ते : मा. प्रा. सुरेश द्वादशीवार (ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक)
विषय : चार्वाक ते पानसरे
संभाव्य अध्यक्ष : डॉ. जयसिंगराव पवार
विशेष उपस्थिती : मा. डॉ. प्रमोद मुनघाटे (ज्येष्ठ साहित्यिक)
ठिकाण : राम गणेश गडकरी सभागृह, दि. न्यू. एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
वेळ : सायंकाळी 4.00 वाजता

3) शनिवार, दि. 28 डिसेंबर 2024
सकाळी 8 ते 11 – कोल्हापूरातील किमान 10 शाळांमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम – क्रिएटिव्ह टीचर्स फोरम, कोल्हापूर
दुपारी 12 ते 4 – शिक्षण परिषद (व्याख्यान, चर्चा, परिसंवाद)
ठिकाण : न्यू कॉलेज, कोल्हापूर

4) दि. 11 एप्रिल 2025 : निमंत्रितांच्या उपस्थितीत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा (७५ वर्षे पूर्ण) – ग्रंथ प्रकाशन व गौरव समारंभ

अमृत महोत्सव समिती आणि अन्य संस्था, संघटना यांचे संयुक्त विद्यमाने काही उपक्रम
1) रविवार दि. 24 नोव्हेंबर 2024 :
चिल्लर पार्टी मुलांना चित्रपट दाखविणे – स्थळ : शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
वेळ : सकाळी 10 वा.

2) फेब्रुवारी 2025 – लोकमंगल मल्टिपर्पज ट्स्ट, सातारा
यांच्यावतीने सातारा येथे व्याख्यानाचे आयोजन

3) मुखपृष्ठ निर्मिती स्पर्धा – सार्थक क्रिएशन कोल्हापूर

४) लेखन- संवाद कार्यशाळा:: डी. आर माने महाविद्यालय कागल

५) वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन – उत्स्फूर्त आयोजक संस्था, संघटना, शाळा,

 

दरम्यान शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीस प्रभाकर हेरवाडे, भाग्यश्री कासोटे, संजय कळके, टी. के. सरगर ,सागर बगाडे, सी.एम. गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!