*गांधी मैदानाच्या कामात राजकारण आणाल तर याद राखा : श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडून महापालिका अधिकारी, ठेकेदाराची कानउघडणी* *गांधी मैदानास मंजूर निधीतून सुरु असलेल्या कामाची पाहणी*

Spread the news

*गांधी मैदानाच्या कामात राजकारण आणाल तर याद राखा : श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडून महापालिका अधिकारी, ठेकेदाराची कानउघडणी*

*गांधी मैदानास मंजूर निधीतून सुरु असलेल्या कामाची पाहणी*

कोल्हापूर दि.०८ : गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे. गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहेच परंतु, पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तांचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे गांधी मैदानापासून निघणाऱ्या नाल्यातील सांडपाणी अडथळा न होता दुधाळी एस.टी.पी प्लांट पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. याकरिता मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. निधी मंजूर होवून कामास सुरवात झाली पण.. काही दिवसांपूर्वी काम बंद असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याच यासह कामाच्या संथगतीमुळे नागरिकांची गैरसोय होवून नाहक गैरसमज निर्माण होत आहे. येत्या पावसाळ्यात पुन्हा गांधी मैदानात पाणी साचले तर गाठ माझ्याशी असल्याचा इशारा देत कोणाच्या तरी सांगण्यावरून गांधी मैदानाच्या कामात राजकारण आणाल तर याद राखा असे खडेबोल सुनावत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदाराची कानउघडणी केली.
नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या रु.५ कोटींच्या निधीतून सुरु असलेल्या कामांची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी याकामाबाबत असणाऱ्या त्रुटी, सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना याबाबतच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावेळी श्री.राजेश क्षीरसागर यांनी मंजूर निधीतून सुरु असलेल्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गांधी मैदानाचे दुखणे कायमचे घालवावे आणि गांधी मैदान खेळाडूंना १२ महिने मैदान उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. निधीही तात्काळ मंजूर करण्यात आला. पण राजकीय दबावातून काम बंद ठेवणे, काम संथगतीने करणे असे प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास येत आहेत. गांधी मैदान शहरासह शिवाजी पेठेची अस्मिता आहे. याकामात राजकारण नको. कोणाच्या दबावाला बळी पडू नका. गांधी मैदानात पुन्हा पाणी साचल्यास महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असतील. कामाचा हेतू स्वच्छ ठेवा हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देत येत्या महिन्यात गांधी मैदानाचे काम पूर्ण करा, अशा सूचनाही श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपशहरप्रमुख योगेश चौगले, कपिल सरनाईक, निलेश गायकवाड, सुनील भोसले, सुरज साळोखे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, शुभम शिंदे, सरिता हारुगले, संग्राम जरग, सचिन पोवार, दादू कांबळे, कोल्हापूर महानगरपालिकेचे शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्य विभागाचे ऋषिकेश सरनाईक, ठेकेदार अविनाश कुलकर्णी, जोश कब्रार आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!