टीव्हीएस मोटर्सच्या वतीने 2023-24 या वर्षातील इलेक्ट्रिक वेहीकल्सचा सर्वाधिक मार्केट शेअर मिळवल्याबद्दल माई टीव्हीएसचा गौरव

Spread the news

 

टीव्हीएस मोटर्सच्या वतीने 2023-24 या वर्षातील इलेक्ट्रिक वेहीकल्सचा सर्वाधिक मार्केट शेअर मिळवल्याबद्दल माई टीव्हीएसचा गौरव

 

टीव्हीएस मोटर्सच्या वतीने 2023-24 या वर्षातील इलेक्ट्रिक वेहीकल्सचा सर्वाधिक मार्केट शेअर मिळवल्याबद्दल माई टीव्हीएसचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यात टीव्हीएस आय क्यूबच्या सर्वाधिक विक्रीत माई टीव्हीएसने हा पुरस्कार पटकावला. मुंबईत झालेल्या समारंभात टीव्हीएस मोटर्सचे व्हाइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) सौरभ कपूर यांच्या हस्ते माई टीव्हीएसचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे व जनरल मॅनेजर अनिल कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कोल्हापूर शहर व जिल्ह्यात माई टीव्हीएसने विक्री व विक्री पश्चात सेवेसाठी ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे ग्राहकांच्या मनात माई टीव्हीएसबद्दल एक अतूट विश्वास निर्माण झाला आहे. ग्राहकसेवा हाच केंद्रबिंदू मानून आजपर्यंत माई टीव्हीएस काम करत राहिली आहे. याचाच परिणाम म्हणून माई टीव्हीएसला हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला असं प्रतिपादन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!