डॉ. बापूजी साळुंखे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयास नवीन अभ्यासक्रमांची मान्यता, प्रवेश क्षमतेत वाढ

Spread the news

 

 

डॉ. बापूजी साळुंखे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयास नवीन अभ्यासक्रमांची मान्यता, प्रवेश क्षमतेत वाढ

कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संंस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी – पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद , नवी दिल्ली यांचेकडून दोन नवीन अभ्यासक्रमांना नुकतीच मान्यता मिळाली.  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजीनिअरिंग असे नवीन अभ्यासक्रम आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत ६० वाढीव जागांना नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

डॉ. बापूजी साळुंखे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय अगदी अल्पावधीतच विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीस पात्र ठरले आहे. व्यवसायाभिमुख अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण आणि 100% प्लेसमेंट यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअर्सना अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये उत्कृष्ट सॅलरी पॅकेजचे जॉब्स उपलब्ध झाले आहेत. महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे आता कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक घटक यांमधील संशोधन आणि विकास यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजीनिअरिंग शाखेचे महत्त्व सध्या कमालीचे वाढले आहे. या शाखेतील अद्ययावत शिक्षण आता महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात उपलब्ध झाले आहे.  महाविद्यालयांमध्ये अगोदरपासूनच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग हे अभ्यासक्रम सुरू आहेत. या सर्व अभ्यासक्रमातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय , खाजगी क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध आहेतच, त्याशिवाय नवउद्योजक (आंत्रप्रोन्युर) आणि स्टार्टअप सुद्धा सुरू करता येतात. एमपीएससी यूपीएससी अभियांत्रिकी सेवांमध्ये जाता येते.

गेली ७० वर्षे उत्कृष्ट ज्ञानदानाची परंपरा असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी हे पॉलिटेक्निकसुद्धा २००९ पासून कार्यरत आहे. या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून दरवर्षी कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, रोजगार मिळाले आहेत. पॉलिटेक्निक मधील कॉम्प्युटर इंजीनिअरिंग अभ्यासक्रमास प्रवेशासाठी 30 वाढीव जागांना नुकतीच मान्यता मिळाली आहे.  पदविका आणि पदवी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास शासनाचे सर्व शिष्यवृती व फी माफी सवलतींचा लाभ मिळत आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स, बसची सोय, तज्ञ प्राध्यापक वर्ग , विविध विषयांमध्ये कार्यरत क्लब्ज अशी महाविद्यालयाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. महाविद्यालयामध्ये पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची सुविधा आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य विरेन भिर्डी यांनी केले

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!