Spread the news

*महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दि.२८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा

राजेश क्षीरसागर यांची माहिती*

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा दि.२८ एप्रिल २०२४ रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकार मधील इतर मंत्री महोदय उपस्थित राहणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!