१५ रिक्षा संघटनांचा महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर करताना आग्रह

Spread the news

 

 

१५ रिक्षा संघटनांचा महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर करताना आग्रह

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूरचा स्वाभिमान आणि सर्वसामान्य प्रामाणिक, कष्टकरी वर्गाचा आवाज दिल्‍लीत घुमला पाहिजे, असा आग्रह करीत कोल्हापूर शहर व परिसरातील तब्बल १५ रिक्षा संघटनांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना जाहीर पाठिंबा व्यक्‍त केला.

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला कोल्हापूर शहर व परिसरातून दिवसागणिक जाहीर पाठिंब्याची मालिका अखंडपणे सुरू असून त्यात आता १५ रिक्षा संघटनांही सामिल झाल्या आहेत. न्यू पॅलेस येथे रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी मालोजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन पाठिंबा देताना आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

या १५ संघटनांमध्ये कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, कॉमन मॅन वाहतूक संघटना, आम आदमी रिक्षा संघटना, काँग्रेस आय अ‍ॅटो रिक्षा संघटना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अ‍ॅटो रिक्षा संघटना, कागल शिरोली पॅसेंजर वाहतूक संघटना, गांधीनगर अ‍ॅटो रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, गांधीनगर अ‍ॅटो रिक्षा संघटना, गोरक्षनाथ पॅसेंजर वाहतूक संघटना, आदर्श रिक्षा संघटना, न्यू करवीर रिक्षा संघटना, करवीर अ‍ॅटो रिक्षा संघटना यांचा समावेश आहे. शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर करताना या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, कॉमन मॅनचे बाबा इंदूलकर, काॅं सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत भोसले, संजय जाधव, शिवसेनेचे राजेंद्र जाधव, केशव माने, वसंत पाटील, अविनाश दिंडे, संभाजी रणदिवे, श्रीकांत पाटील, जाफर मुजावर, शिवाजी पाटील, शंकरलाल पंडीत, ईश्‍वर चन्‍नी, सुभाष शेटे, अतुल पोवार उपस्थित होते.

शाहू महाराज नामावलीतून पाठिंबा

रिक्षा संघटनांचे पदाधिकारी रिक्षा घेउन न्यू पॅलेस येथे आले होते. शाहू महाराजांना पाठिंबा व्यक्‍त करताना पोलो मैदानावर आपल्या रिक्षांची मांडणी करून ‘शाहू महाराज’ या नावाची प्रतिमा तयार केली होती. पाठिंबा देण्याच्या रिक्षा चालकांच्या या अनोख्या शैलीची चर्चा दिवसभर रंगली होती.

कोट

रिक्षा चालक म्हणजे स्टारप्रचारक

आपल्या प्रामाणिकपणाच्या अनेक उदाहणांबद्दल राज्यात परिचित असलेल्या कोल्हापुरातील रिक्षाचालकांनी पाठिंबा बहुमोल ठरणार आहे. रिक्षाचालकांचा वावर संपूर्ण शहर, उपनगरे आणि आसपासच्या ग्रामीण भागात असल्याने ते या निवडणुकीत शाहू छत्रपतींचे स्टार प्रचारक ठरणार आहेत.
मालोजीराजे छत्रपती माजी आमदार

…..

*छत्रपती शाहूंच्या दणदणीत विजयासाठी राधानगरीतून उच्चांकी मताधिक्य देवू : हिंदुराव चौगले यांची ग्वाही*

 

राधानगरी तालुक्यात शाहू छत्रपतींच्या प्रचाराचा झंजावात ; शेळेवाडी, तुरंबे, कसबा वाळवे येथील सभांना मोठा प्रतिसाद

 

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता श्रीमंत शाहू छत्रपतींचा विजय ही फक्त घोषणा होणे बाकी असून त्यांच्या दणदणीत विजयासाठी राधानगरी तालुका उच्चांकी मताधिक्य देईल अशी ग्वाही राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी दिली.

आज इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहूंच्या प्रचारासाठी शेळेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रारंभी गावच्या प्रवेशद्वारापासून म्हसोबा मंदिर परिसरापर्यंत शाहू छत्रपतींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून फुले उधळण्यात आली. यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी भव्य पदयात्राही काढली. या सभेत बोलताना शिवसेनेचे नेते विजय देवणे म्हणाले,” खासदार संजय मंडलिक,आमदार प्रकाश आबिटकर हे मूळ शिवसेना सोडून गद्दारी करून केवळ सत्तेच्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांच्या सोबतीला जाऊन बसले आहेत. अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठीच शाहू महाराजांना विजयी करूया.”

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले,”माझी उमेदवारी ही रयतेने दिलेली उमेदवारी असून शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी अशा सर्व घटकांच्या विकासासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील.”

प्रवीण पाटील यांनी स्वागत व सर्जेराव कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

शिवसेनेचे दत्तात्रय निकम यांचेही भाषण झाले.सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार )जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शेका पक्षाचे दत्तात्रय हणमा पाटील, गोकुळ चे संचालक आर.के. मोरे, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, शिवसेना उपनेते सुरेश चौगले, बाबा पाटील,भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष पी डी धुंदरे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, सुशील पाटील -कौलवकर, कम्युनिस्ट पक्षाचे सतीश कांबळे,जयसिंग पाटील, गीता पाटील, संजय पाटील, अवधूत पाटील, रंगराव पाटील, अशोक पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, तुरंबे येथील सभेत बोलताना जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले,”राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची भूमिका भाजपसोबत जाण्याची असली तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनता दलाचा पाठिंबा हा शाहू महाराजांना आहे. शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची भूमिका निर्णायक ठरेल.”

या सभेत श्रीमंत शाहू छत्रपती,वैभव ताशीलदार, नामदेव चौगले,प्रकाश पवार आदींची भाषणे झाली. सभेला सुप्रिया साळोखे, संभाजी देसाई, विष्णुपंत यादव, रमेश वारके, सागर भावके, दीपक चौगले, किरण नार्वेकर, सुरेश पाटील, विठ्ठल मुसळे, बंडा पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, कसबा वाळवे येथे झालेल्या सभेपूर्वी श्रीमंत शाहू छत्रपतींनी वीर हुतात्मा स्मारक तसेच स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा गोपाळराव फराकटे स्मारकांना अभिवादन केले.

या सभेत दत्तात्रय पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती, आम आदमी पक्षाचे अर्जुन कांबळे यांची भाषणे झाली. चंद्रकांत पाटील,विश्वासराव घाटगे, प्रभाकर पाटील, दिगंबर साठे, संतोष मेंगाने, सुवर्णा पाटील, अविनाश तराळ, बापू किल्लेदार, प्रल्हाद पाटील,सुनील मांडवकर, प्रकाश पाटील शिवाजी फराकटे आदी उपस्थित होते

………..

चौकट १

इडीची भीती असणारेच आता पालकमंत्री

 

कसबा वाळवे येथील सभेत बोलताना कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी कागलमध्ये ज्यांना इडीची भीती घातली गेली तेच आता आपले पालकमंत्री असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. त्याला उपस्थित आणि टाळ्यांचा कडकडाट करीत प्रतिसाद दिला.

……………

चौकट २

सामान्यांच्या पंगतीत जेवणारे श्रीमंत शाहू छत्रपती हेच वारसदार

चांदेकरवाडीचे माजी सरपंच तानाजी खोत म्हणाले,राजर्षी शाहू महाराज दाजीपूरच्या जंगलात आले की धनगरांच्या झोपडीत बसून आंबील आणि कन्या खायचे.आत्ताचे उमेदवार असलेले श्रीमंत शाहू छत्रपती हे सुद्धा अगदी सर्वसामान्यांच्या लग्न व इतर समारंभात रयतेबरोबर पंगतीत बसून जेवण करतात हा माझा अनुभव असल्याने तेच राजर्षी शाहूंचे वारसदार आहेत.

…………..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!