तालमींच्या माध्यमातून सलोखा राखणाऱ्या शाहू महाराजांना विजयी करा* मालोजीराजे छत्रपती यांचे कोल्हापुरात आवाहन

Spread the news

* तालमींच्या माध्यमातून सलोखा राखणाऱ्या शाहू महाराजांना विजयी करा*

  • मालोजीराजे छत्रपती यांचे कोल्हापुरात आवाहन 

कोल्हापूर

सर्वसामान्य नागरिक, तालमी, मंडळे यांच्याशी शाहू छत्रपतींनी कायम संपर्क ठेवला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरची ओळख समतावादी रहावी यासाठी तालमी, मंडळांच्या माध्यमातून जातीय सलोखा राखणाऱ्या शाहू छत्रपतींना लोकसभा निवडणूकीत विजयी करावे, असे आवाहन मालोजीराजे यांनी केले.

मालोजीराजे यांनी शनिवारी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींच्या यांच्या प्रचारार्थ मालोजीराजे यांनी जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला.

मालोजीराजे यांनी माजी उपमहापौर चंद्रकांत सांगावकर, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, निशिकांत मेथे, विजय साळोखे सरदार, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक राम साळुंखे, उद्योजक इदाते, रमेश चित्रुक यांच्यासह मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या. मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष बाळ घाटगे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या घरी भेट देऊन मालोजीराजे यांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

मालोजीराजे यांनी शिवाजी पूल, मुळे गल्ली, ख्रिश्चन वसाहत, ब्रह्मपुरी, जुना बुधवार पेठ तालीम मंडळ, तोरस्कर चौक, हळदकर गल्ली, डांगे गल्ली, ढिसाळ गल्ली, शहीद भगतसिंग तरुण मंडळ, नरसोबा गल्ली, शिपुगडे तालीम मंडळ, निकम गल्ली, बोडके गल्ली, जैन बस्ती, परिट गल्ली, भोई गल्ली, अवधूत गल्ली, खोलखंडोबा तालीम मंडळ, डंगरी गल्ली, शिवगणेश मंदिर, सोमेश्वर गल्ली, पिवळावाडा, बुरुड गल्ली विठ्ठल मंदिर, बुरुड समाज मंदिर, कोकणे मठ, सोन्यामारुती चौक, गवळी गल्ली, नष्टे गल्ली, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, बजाप माजगांवकर तालीम मंडळ, गांधी तरुण मंडळ, बाजारगेट परिसरातील मतदारांशी संवाद साधला.

यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, अफजल पिरजादे, महेश कदम, शशिकांत पाटील, अनिल पाटील, इंद्रजीत आडगुळे, जयवंत सोनवले, सुशील भांदिगरे, विजय सावंत, मुसा कुलकर्णी, सुनील भांबुरे, रणजीत शिंदे, धनाजी शिंदे सरकार, शिवानंद बनछोडे, अनिल निकम, बिपीन घोरपडे, राकेश पाटील, नेपोलियन सोनुले, तानाजी पाटील, अजित पाटील, प्रताप घोरपडे, महावीर पोवार, महेश स्वामी, मकरंद स्वामी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* भाजप सरकारने सरकारी मालकीच्या २६ संस्था उद्योगपतींना विकल्या*

आमदार पी. एन. पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : ‘दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणाऱ असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले होते. त्यानुसार दहा वर्षात
वीस कोटी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारकडे तरुणाई,
शेतकरी हिताची धोरणे नाहीत. तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच नाहीत. उलट भाजप सरकारने, फायद्यात असलेल्या सरकारी
मालकीच्या २६ संस्था उद्योगपतींना विकल्या. पंतप्रधान मोदी हे कोणासाठी सरकार चालवित आहेत ? उद्योगपतींसाठी की सर्वसामान्य
लोकांसाठी ?’असा खडा सवाल काँग्रेसचे नेते व करवीर मतदारसंघातील आमदार पी. एन. पाटील यांनी केला.

महाविकास विकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ बहिरेश्वर, म्हारुळ, आमशी, पासार्डे,
खाटांगळे, चिंचवडे तर्फ कळे, भामटे, कळंबा तर्फ कळे, कोपार्डे, कुडित्रे येथे संपर्क मेळावे झाले. वाकरे येथे प्रचार सभा झाली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी के. डी. माने होते. भगवान पाटील, अशोक माने, विजय पोवार, सुरेश माने यांची उपस्थिती होती.
या सभेत आमदार पी. एन. पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला. आमदार पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी
निवडून आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे सांगितले होते. भाजप सरकारला दहा वर्षे
झाली पण शेतकऱ्यांना काही कर्जमाफी मिळाली नाही. मात्र काँग्रेस आघाडी सरकारने नेहमीच शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांच्या उत्कर्षासाठी धोरणे राबविली. तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग, तत्कालिन कृषिमंत्री शरद पवार यांच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी ७२ हजार कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा हा क्रांतिकारी निर्णय होता.
शेतकऱ्यांसह संपूर्ण समाज घटकाच्या उन्नतीसाठी पुन्हा एकदा इंडिया आघाडीला साथ द्या. कोल्हापुरातील उमेदवार शाहू छत्रपती यांना देशात
सर्वाधिक मतांनी निवडून देऊ या.’
शाहू छत्रपती म्हणाले, ‘केंद्रातील सरकारकडे शेतकरी हिताची दृष्टी नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र त्यांना न्याय
देण्याची भूमिका सरकारकडे स्वीकारली नाही. उलट सरकारी यंत्रणांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रकार केला. पंजाबमधील शेतकरी
आंदोलनानंतर भाजपा सरकारची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी पडेल अशी भीती वाटते. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी
निवडणुकीच्या मैदानात आहे. रयतेच्या बळावर माझी उमेदवारी असून विजय निश्चित आहे.’ अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कॅप्टन
उत्तम पाटील यांनी आभार मानले.
……………
ठिकठिकाणच्या संपर्क मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक विश्वास
पाटील, शेकापचे बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे संचालक पैलवान संभाजी पाटील कुडित्रेकर, शेतकरी संघटनेचे दादू कामिरे, कुंभी
कारखान्याचे माजी चेअरमन संभाजी ज्ञानू पाटील, यशवंत बँकेचे एकनाथ पाटील, आरपीआयचे दगडू भास्कर आदींची भाषणे झाली.
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी. धुंदरे, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, भोगावती साखर कारखान्याचे
चेअरमन शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, राजेंद्र खानविलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील,
शेकापचे केरबा पाटील, माजी नगरसेवक माणिक मंडलिक आदींचा सहभाग होता.

*युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी नागाव येथे शिवारात जाऊन शेतकऱ्यांची घेतली भेट*

समस्या जाणून घेऊन शेतीविषयी केली चर्चा

कोल्हापूर :

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी भाग आणि भाग पिंजून काढत आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागाव गावांत येताना
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट शेतात जाऊन भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतीविषयी चर्चा केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शाहू महाराज यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतात उसाची भरणी, भांगलण आदी कामे सुरु होती. यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी उसाची भरणी कधी केली, लागण किती महिन्याची आहे, कोणकोणती आंतरपिके घेता, पाण्याची सोय कशी आहे, सेंद्रिय शेती करता काय आदी विषयावर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी शेती करताना खताचे वाढणारे दर, वाढती महागाई, रात्रीचे शेतीला मिळणारे पाणी याबाबत सत्ताधारी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.

यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी, शेतकऱ्यांना जी शेती आपण रासायनिक शेती करता त्यातीलच काही भागात सेंद्रिय शेती करून विषमुक्त भाजीपाला, धान्य घेण्याचा प्रयत्न करावा. कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे सेंद्रिय पिकांना चांगला दर मिळत आहे. त्याची मागणी वाढत आहे. यासाठी सामूहिकरित्या प्रयत्नाची गरज आहे असे सांगितले.

शेवटी युवराज्ञी संयोगिराजे छत्रपती यांनी
शेतकऱ्यांना लोकसभेला शाहू महाराजांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आम्ही काँग्रेससोबतच राहणार, आमच्या शाहू महाराजांनाच मतदान करणार असे आवर्जून सांगितले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!