केंद्राच्या धोरणाचा सर्वसामान्यांना फटका राजू शेट्टी यांची टीका

Spread the news

 

केंद्राच्या धोरणाचा सर्वसामान्यांना फटका

 

राजू शेट्टी यांची टीका

 

सातवे ( प्रतिनिधी )
देशामध्ये शेतकरी , शेतमजूर , कामगार , कष्टकरी लोकांचा आवाज संसदेत पुन्हा त्याच ताकदीने मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लोकवर्गणीतून लढवित असून सर्वसामान्य जनतेच्या चेह-यावरती परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे. महागाई , बेरोजगारी , शिक्षणाचे झालेले बाजारीकरण , सामाजिक अस्वस्थता यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. या प्रश्नावर बोलण्याची हिम्मत सध्याच्या लोकप्रतिनिधींच्यामध्ये नाही. केंद्र व राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत वेगवेगळी धोरणे राबवित असून यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत असल्याची टिका सातवे ता. पन्हाळा येथील जाहीर सभेत केली.
सामान्यांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावरची लढाईबरोबर सभाग्रहातील लढाई एकत्रितपणे लढल्यास शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळतो. सरकारने कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेकडून वसुली करतात मात्र त्याचा परतावा उद्योगपींची कर्जे राईट ॲाफ करण्यासाठी केली जाते ही शोकांतीका आहे. सामान्यापर्यंतच्या योजना फक्त कागदावरच असून त्याची जाहीरातबाजी करण्यात येत आहे.देशामध्ये सर्वाधिक उद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कृषी , वस्त्रोद्योग व औद्योगीक क्षेत्राकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्यानेच बेरोजगारी वाढू लागली आहे.
मतदारसंघातील औद्योगीक क्षेत्राकरिता पायाभूत सुविधाचा अभाव असून औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते , गटर्स , वीज , कामगारांना आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे. आजही इचलकरंजी सारख्या शहरात नवीन उद्योगासाठी उद्योजकांना वीजेची कमतरता पडू लागली आहे. सरकारने पर्यटनाच्या नावाखाली भपकेबाज पणा केला असून हातकंणगले मतदारसंघातील सह्याद्री पर्वत रांगाच्या परिसरात असलेल्या पर्यटनास चालना देणे गरजेचे आहे.पन्हाळा , शाहूवाडी व शिराळा तालुक्यातील डोंगरी भागात वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीत हल्ले वाढू लागल्याने व पिकांचे मोठे नुकसान करू लागल्याने डोंगरी भागातील लोकांना त्रास होवू लागला आहे.यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॅा. जालंदर पाटील , जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे , जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील , पन्हाळा तालुकाध्यक्ष विक्रम पाटील यांचेसह सातवे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!