छत्रपती घराणे २४ तास जनतेसाठी उपलब्ध ….युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

Spread the news

छत्रपती घराणे २४ तास जनतेसाठी उपलब्ध

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर :

शककर्ते शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी महाराज यांच्या विचाराचा आणि आचाराचा वारसा घेऊन विद्यमान अधिपती शाहू छत्रपती महाराज निवडणुकीला लोक आग्रहास्तव उभे आहेत. छत्रपती घराणे कोल्हापूरच्या विकासासाठी नेहमीच सक्रिय राहिले आहे. या ठिकाणी सर्वांना अस्वस्थ करितो की, सर्वसामान्य जनतेसाठी छत्रपती घराणे हे २४ तास उपलब्ध आहे असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील
त्र्यंबोली कॉलनी, प्रगती, सदानंद कॉलनी, सुदर्शन गणेश मंदिर, महापौर चौक
टेंबलाईवाडी भागात प्रचार दौरा
झाला. दरम्यान, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी
लोकसहभागातून झालेल्या टेंबलाईवाडी
क्रीडांगणाला भेट देऊन युवकांच्या समाजिक आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भागातील प्रमुख कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या समतेच्या, पुरोगामी विचाराने चालणारा जिल्हा आहे. आपले उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे देखील हाच वारसा व विचार घेऊन पुढे निघालेत. आम्ही त्यांना निवडून आणणारच असा ठाम विश्वास दिला.

यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, सुलोचना नाईकवाडे, माधुरी संजय लाड, अजित माने, भाग्यश्री क्षीरसागर, ऍड. सुनील धुमाळ, नागेश पाटील, सचिन शिंदे, रोहिणी पाटील, दौलतराव शिंदे, सीमा ठाकूर, राजेंद्र पाटील, योगेश अजाटे, संदीप आढाव, लक्ष्मण काशीद, हणमंत सुतार, अशोक मुसळे, सचिन कंदले, संजय नाईकुडे, एस एन पाटील, डी.एम.पाटील, संजय कदम यांचेसह आघाडीचे व घटक पक्षांचे कार्यकर्ते, महिला, युवक उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!