संजय मंडलिक यांना मताधिक्य देणार अशोक चराटी यांची ग्वाही

Spread the news

 

संजय मंडलिक यांना मताधिक्य देणार

  • अशोक चराटी यांची ग्वाही

आजरा

दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड विकासाची कामे केली, त्यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना आजरा तालुक्यात मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी दिली.

आजरा येथे झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात चराटी यांनी ही ग्वाही दिली. चराटी म्हणाले, देशात पंतप्रधान मोदी यांनी प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. देशाला अजूनही प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोल्हापूरचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणणे आपली जबाबदारी आहे.

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, कोल्हापूर मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार मंडलिक यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विकासाच्या दृष्टीला बळकट करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना बळ देण्यासाठी मंडलिक यांना निवडून द्यावे.

यावेळी आजरा बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुलकर, भाजपचे आजरा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, विलास नाईक, अनिल देशपांडे, दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, जी. एम. पाटील, जयवंत सुतार, निवृत्ती शेंडे, अतिश कुमार देसाई, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, मंडलिक यांनी विविध भागात प्रचाराला जोर लावला असून गारगोटी, आजरा, गडहिंग्लज भागात विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!