कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने दिलेले दोन्ही खासदार गद्दार
,,,त्याना पाडून शाहू महाराज आणि सत्यजीत पाटील यांना संसदेत पाठवूया
शिवसेना ठाकरे गटाचे सम्पर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचे भावनिक आवाहन
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आणि हातकनंगले मतदार संघातील सत्यजीत पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचा भव्य मेळावा
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अपूरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन – दोन खासदार निवडून दिले . दोघांनीही जनतेच्या विश्वासाला तडा देत गद्दारी केली . पण निष्ठावान शिवसैनिक आणि स्वाभिमानी जनता या दोन्ही गद्दाराना धड़ा शिकवत कोल्हापुर लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार सत्यजीत पाटील- सरुड़कर यांना विजयी करुन गद्दार प्रवृत्तीला गाडून टाकतील ,असा एलगार पुकारत शिवसेनेचे उपनेते आणि कोल्हापुरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यानी शिवसेना ठाकरे गट संविधानाची मोडतोड़ करू पहाणाऱ्या प्रवृतीचा बीमोड करण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा आज कोल्हापुरात बोलताना दिला.
महाविकास आघाडीचे कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आजच उमेदवारी झालेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजीत पाटील- सरुड़कर यांच्या प्रचारार्थ दोन्ही मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा शाहू स्मारक भवनात झाला . यावेळी दूधवाडकर बोलत होते .
यावेळी बोलताना दुधवाडकर यानी एकीकडे सातारा मतदारसंघातील उमेदवारी साठी उदयनराजे भोसले यांना दिल्ली वारी करायला लावत प्रतीक्षा करायला लावणारे भाजप नेतृत्व असे चित्र दिसत असताना उमेदवारी जाहीर झाली नसतानाही शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी आदर सन्मान देत स्वतः न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेतली आणि त्याना पाठिंबा जाहीर केला . हा मूलभूत फरक लक्षात घेण्याची गरज व्यक्त केली .
पेटून उठलेला शिवसैनिक आता माघार घेणार नाही . तर शाहू महाराजांना विजयी करुन महाविकास आघाडीचे खासदार म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे प्रतिपादन त्यानी केले . शिवसैनिकाना आवाहन करतांना शाहू महाराज नव्हे तर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार असल्याचे समजून शिवसैनिकानी शाहू महाराजांच्या हात या चिन्हाचा घरोघर प्रचार करण्याचे आवाहन दुधवाडकर यानी केले . मुंबईत भाजपने दिलेले तिन्ही उमेदवार गुजराती असल्याच्या मुद्द्यावर जोर देत भाजपला महाराष्ट्र विचलित करायचा असल्याचा आरोप त्यानी केला . पण संविधान आणि देश अडचणीत आल्याने राजेपदाची वस्त्रे बाजूला ठेऊन शाहू महाराज भाजप सारख्या देशाची शकले करायला निघालेल्या प्रवृतीचा बदला घेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याच्या बाबीकडे त्यानी उपस्थितांचे लक्ष वेधले . भाजपच्या संविधानाची मोडतोड़ करण्याच्या कारस्थानाला शाहू महाराज यशस्वी होऊ देणार नाहीत ,असा विश्वास त्यानी व्यक्त केला .
यावेळी बोलताना शाहू महाराजांनी सद्याची परिस्थिती पाहता देश हुक़ूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची चिन्हे दिसत असल्याची भीती व्यक्त केली . संविधानाचे रक्षण करण्यासाठी सावध राहण्याची गरज त्यानी बोलून दाखवली .नरेंद्र मोदी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बळ देण्याचे आवाहन शाहू महाराजांनी केले . कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेस – राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि मित्रपक्ष असलेल्या बहुजन वंचित आघाडीची एकीची वज्रमुठ प्रतिगामी आणि देशविरोधी शक्तीना धूळ चारेल ,असा विश्वास त्यानी व्यक्त केला . मूळ पक्षाशी बेईमानी करणाऱ्या संधीसाधुना धड़ा शिकवन्या साठी पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज शाहू महाराजांनी व्यक्त केली .हातकणंगले लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झालेले माजी आमदार सत्यजित पाटील – सरुड़कर यांचे अभिनंदन करुन त्याना शाहू महाराजांनी शुभेच्छा दिल्या .
हातकनंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील- सरुड़कर यानी गट-तट विसरून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराना विजयी करण्यासाठी शिवसैनिकानी एकी कायम ठेवावी ,असे आवाहन केले .
यावेळी बोलताना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यानी गद्दार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांना पराभूत करतानाच शाहू महाराज आणि सत्यजित पाटील हे दोन्ही महाविकास आघाडीचे उमेदवार किमान तीन लाखांच्या मताधिकयाने विजयी होतील ,असा विश्वास व्यक्त केला . विरोधी उमेदवारानी माध्यमाशी बोलताना पातळी सोडून बोलू नये असा गर्भित इशारा देवणे यानी दिला . पक्षाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यानी आमच्याकडे सन्मान प्राप्त करणारे संजय मंडलिक यांना शिंदे गट आणि भाजपकड़े गेल्यावर अपमान सहन करावा लागत असल्याची उपरोधिक टीका केली . भाजप पदाधिकारी वर्गाकडून संजय मंडलिक यांच्यावर झालेल्या आऱोपाचा सन्दर्भ देताना त्यांची अवस्था ‘ कोण होतास तु ,,,क़ाय झलास तू ‘अशी झाल्याची मिश्किल टिपणी पवार यानी केली . यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे , माजी आमदार सुरेश साळोखे , संजयबाबा घाटगे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले , आदिनी आपले मनोगत व्यक्त केले . महाविकास आघाडीच्या श्रीमंत छत्रपतीं शाहू महाराज आणि सत्यजित पाटील – सरुड़कर या दोन्ही उमेदवारांचा उपनेते अरुण दुधवाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी माजी आमदार उल्हास पाटील , माजी आमदार आणि गोकुळ संचालक सुजीत मिनचेकर, सह सम्पर्कप्रमुख हाजी अस्लम सैय्यद ,अंबरीश घाटगे , शहरप्रमुख सुनील मोदी ,हर्षल सुर्वे ,पोपट दांगट , अवधूत साळोखे ,सुरेश पवार ,बाजीराव पाटील , संभाजी भोकरे , संभाजी पाटील ,प्रकाश पाटील , सुरेश चौगले ,शांता जाधव ,शुभांगी पोवार , अंबरीश घाटगे , वैभव उगले, संजय चौगुले ,चंगेजखान पठाण ,विराज पाटील , आदि मान्यवर उपस्थित होते .