- राजे मंडलिक गटच मंडलिक यांना विजयी करेल
कोल्हापूर
कागल तालुक्यात राजे आणि मंडलिक गटाची युती भक्कम असून हा गट समन्वयाने काम करत संजय मंडलिक यांना विजयी करेल असा निर्धार करण्यात आला.
कागल, गडहिंग्लज व उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्धार करण्यात आला.
यावेळी खासदार संजय मंडलिक आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे उपस्थित होते.
खासदार मंडलिक म्हणाले, रा. शाहू महाराजांचा वारसा सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून चालवला. तोच वारसा आम्ही आता चालवत आहोत.
समरजीत घाटगे म्हणाले, गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने प्रचंड विकास कामे केली आहेत. याच जोरावर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून द्यावे.
यावेळी राजेंद्र तारळे, अमरसिंह घोरपडे, एम पी पाटील, रमेश माळी, वीरेंद्र मंडलिक, आनंद फर्नांडिस, विवेक कुलकर्णी, संजय पाटील, उपस्थित होते.
…
मंडलिक यांना विजयी करण्याचे नरकेंचे आवाहन
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात रस्ते, रेल्वे, विमानतळ या प्रचंड विकास कामे केली आहेत. अशा विकास कामे करणाऱ्या खासदारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे असे आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
अमृतसिद्धी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मेळाव्यात त्यांनी आवाहन केले. नरके म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीत होईल. यावेळी अजित नरके, अजित पाटील, एस आर पाटील, संजय जाधव, संजय पाटील, कृष्णा पवार उपस्थित होते.