श्रीमंत शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा
- संयोगिता राजे यांचे आवाहन
करवीर तालुक्यात महाराजांना उस्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ संयोगिता राजे छत्रपती यांनी मंगळवारी करवीर तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. कोल्हापूरच्या विकासाला नवा चेहरा देण्यासाठी शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रचार दौऱ्यात संयोगिता राजे यांनी छत्रपती घराणे आणि कोल्हापूरच्या प्रगतीचा आजवरचा इतिहास सांगत राजघराणे आणि कोल्हापूरकरांचे असलेले ऋणानुबंध व्यक्त केले.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी संयोगिता राजे यांनी सादळे मादळे, शिये, जठारवाडी, भुये, भुयेवाडी, निगवे, केर्ली, केर्ले, आणि पडवळवाडी यासह अन्य गावातील नागरिकांची भेट घेतली. त्यांच्यासोबत युवा नेते राहुल पाटील यांच्या पत्नी तेजस्विनी पाटील होत्या. सादळे गावातील दूध सोसायटी परिसरात संयोगिता राजे छत्रपती यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना संयोगिता राजे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थान काळात शिक्षण महिलांसाठी सुविधा, कला, क्रीडा या क्षेत्रातील विकास केला. राजकारणापेक्षा समाजकारण हा छत्रपती घराण्याचा वारसा आहे, तोच वारसा आजच्या काळातही जपला जावा यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या बरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांनी ही प्रयत्न केले आहेत. संभाजीराजे खासदार असताना गॅस पाईपलाईन तसेच रखडलेल्या शिवाजी पुलाच्या कामाची पूर्तता केली.
त्या म्हणाल्या, संभाजीराजेंनी त्यांच्या खासदारकीच्या काळात जाखले गाव दत्तक घेऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. छत्रपती शाहू महाराज यांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारी कोणत्याही गट तट पक्ष यासाठी नसून स्वाभिमानी कोल्हापूरकरांसाठी आहे. भविष्यात कोल्हापुरात आयटी पार्क विविध उद्योग प्रकल्प तसेच कोल्हापूरचा धोरणात्मक विका साच्या संकल्पना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून शाहू महाराज यांची निवड खासदार पदासाठी कोल्हापूरकरांनी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सरपंच बाजीराव पाटील, शेकापचे माणिक शिंदे, काँग्रेसचे गटप्रमुख अभिजीत पाटील, शियेचे सरपंच शितल मगदूम, हणमंत पाटील, जयसिंग पाटील यांची तर जठारवाडी येथे शिवसेना तालुका उपाध्यक्ष संजय खाडे भुयेगावात तंटामुक्त समितीचे सदस्य विक्रम पाटील भारत पाटील उपसरपंच अश्वेश खाडे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील विलास पाटील, भुयेवाडी गावात शिवाजी माने उपस्थित होते. छत्रपती संयोगिता राजे यांनी भुयेवाडी येथील सोसायटीचे अध्यक्ष भानुदास हूजरे पाटील यांच्या निवासस्थानी पिठले भाकरी खात साधेपणा कृतीतून दाखवून दिला. त्यानंतर संयोगिता राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी निगवे गावात आल्या. या ठिकाणी माजी उपसरपंच गिरीश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपसरपंच गोपी एकशिंगे , ग्राम पंचायत सदस्य अर्जुन पाटील, संग्राम पाटील, रणजीत चव्हाण आदि उपस्थित होते.
केर्ली गावात शिवसेना विभाग प्रमुख भीमराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, कृष्णात नलवडे, अमित चौगुले उपस्थित होते .तर केर्ले गावात दशरथ माने गटाचे उपसरपंच जालंधर कुंभार, अजित माने, पंडित नलावडे उपस्थित होते.