संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करा इंडिया व महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचे आवाहन

Spread the news

संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करा

इंडिया व महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचे आवाहन

श्रीमंत शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धार

कोल्हापूर

संविधान धोक्यात आणणाऱ्या, देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू ठेवलेल्या शक्ती विरोधात
लोकशाहीची आता खरी लढाई सुरू झाली आहे, लोकशाहीच्या या अस्तित्वाच्या लढाईसाठी इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना देशात मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणूया असा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. भारताचे भविष्य सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात चिंताजनक असल्याने देशाला योग्य दिशा देण्यासाठी इंडिया आघाडीला निवडून द्यावे असे आवाहन या बैठकीत आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्ष्यांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच मित्र पक्षांनी शाहू महाराज यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी एक दिलाने काम करण्याचा निश्चय व्यक्त केला.

या बैठकीत बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील म्हणाले, महाराजांची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेच्या मनातून आलेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराज संसदेत जाणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्या विजयासाठी आपण सर्वजण जीवाचे रान करू.

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, गेल्या 35 वर्षात महाराजांनी सामाजिक काम करताना, अडचणीत आलेल्या घटकांना मदत करताना कधीही सत्तेचा विचार केला नाही. आता समाजकारणाला ताकद देण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी निवडून देणे आवश्यक आहे. भीती दाखवून पक्ष फोडणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे, अशावेळी महाराजांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आज अडचणीत येत असताना महाराजांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाला ताकद देण्याची जबाबदारी आपली आहे.

शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेला उपलब्ध राहून त्यांची सेवा करणाऱ्या शाहू महाराजांना निवडून आणणे आता आवश्यक आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेनेच प्रचारात उतरावे लागेल.

जनता दलाच्या स्वाती कोरी म्हणाल्या, रा. शाहूंच्या ऋणातून उतराई व्हायचे असेल तर श्रीमंत शाहू महाराज यांना विजय करणे हे आपले कर्तव्य आहे.

श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई म्हणाले, आज संविधान धोक्यात आहे. हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी लोकशाही बळकट करण्यासाठी महाराजांना विजयी करणे अत्यावश्यक आहे.

शाहू महाराज म्हणाले, 65 वर्षात काँग्रेसने विकासाचा पाया रचला संविधान बळकट केले. पण आता संविधान बदलायचे काम सुरू आहे. काँग्रेसने अथवा विरोधकांनी काहीच केले नाही असा खोटा प्रचार सुरू आहे. अशा वेळी हुकूमशाही कडे वाटचाल करणारी सत्ता बदलायचे असेल तर मतपेटीतूनच ते आपण बदलू शकतो त्यासाठी जनतेने सज्ज व्हावे.

प्रारंभी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. या मेळाव्यास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संभाजी पाटील, जनता दलाचे प्रदेश पदाधिकारी प्रताप होगाडे, शिवाजीराव परुळेकर, लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, माकपचे उदय नारकर, सुभाष जाधव, भाकपचे सचिव सतीश कांबळे, चंदगडचे गोपाळ पाटील, समाजवादी पार्टीचे रवी जाधव, शेकापचे बाबुराव कदम यांच्यासह विविध मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीत विविध मान्यवरांनी शाहू महाराज यांना विजयी करण्याचा निर्धार करतानाच प्रचाराच्या नियोजनाच्या सूचना केल्या. यामध्ये भाकपचे चंद्रकांत यादव, प्राचार्य राजेंद्र कुंभार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस एकनाथ देशमुख, कागल तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, विनय कदम, सुनील देसाई, अश्विनी माने, गिरीश फोंडे, धनराज चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, आम आदमी पक्षाचे विभागीय अध्यक्ष संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष रुपेश पाटील, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, संजय देसाई, अनिसचे कृष्णा स्वाती, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, ओबीसी महासंघाचे दिगंबर लोहार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, जे. बी. पाटील, हसन देसाई, टी. एस. कांबळे यांच्यासह अनेकांनी शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया अशी ग्वाही दिली.

या मेळाव्यास बाळासाहेब सरनाईक, प्राचार्य बी. एम. हिरडेकर, माजी नगरसेविका भारती पोवार, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया पाटील, शहराध्यक्ष संध्या घोटणे, पद्मजा टिवले, माजी नगरसेवक सारंगधर देशमुख, मल्हार सेनेचे बबन रानगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शंकरराव पाटील, अनिल घाटगे, नितीन पाटील, दुर्वास कदम सुरेश शिरपूरकर, प्रा किसन कुराडे, अवधूत साळोखे, विराज पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील सुधाकर साळोखे, सदाशिव चरापले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!