चेतन मोटर्स : ग्राहक सेवेची २० वर्षे..!!

Spread the news

  1. चेतन मोटर्स : ग्राहक सेवेची २० वर्षे पूर्ण..!!

 

*आजपासून २० वर्षांपूर्वी टाटा मोटर्ससाठी जेव्हा सक्षम डीलरशिपची गरज होती, तेव्हा फक्त घाटगे ग्रुपचे नाव टाटा मोटर्सच्या नजरेसमोर होते. याचे कारण म्हणजे गेल्या जवळपास साठ वर्षांपासून घाटगे यशस्वीपणे वाहतूक व्यवसाय चालवत होते. सर्व प्रकारच्या रस्त्यांवरून हा व्यवसाय चालत असल्याने वाहनांच्या देखभालीबाबत जागरुक अशी घाटगेंची ओळख होती. आणि त्यामुळेच एकेकाळचे टाटा मोटर्सचे ग्राहक असणारे घाटगे टाटा मोटर्सचे भागीदार झाले. याला गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त…*

चेतन मोटर्स या नावाने घाटगे यांनी उचगावमध्ये टाटा मोटर्सची डीलरशिप २००४ मध्ये सुरू केली. टाटा मोटर्सने २००५ मध्ये आणलेल्या टाटा एस म्हणजेच छोटा हातीच्या स्वरूपात चेतन मोटर्स खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचला.

उंचगाव मध्ये असणाऱ्या पहिल्या शाखेनंतर जिल्ह्यातील ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देता यावी, म्हणून गडहिंग्लज, इचलकरंजी येथे स्वतःची आधुनिक वर्कशॉप्स सुरू केली. हायवेवरून जाणाऱ्या मोठ्या वाहनधारकांसाठी गोकुळ शिरगाव येथे कंटेनर वर्कशॉप सुरू केले.

टाटाच्या कोणत्याही वाहनातील कितीही क्लिष्ट समस्या असो. चेतन मोटर्सचे टेक्निशियन्स ही समस्या सोडविणारच. यामुळे टाटा मोटर्समध्ये चेतन मोटर्सची वेगळी ओळख आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून चेतन मोटर्सला २०१७ मध्ये सांगली जिल्ह्यात वाहन विक्री, विक्री पश्चात सेवा पुरवण्यासाठी टाटा मोटर्सने संधी दिली. चेतन मोटर्सने संधीचे सोनं केले. अल्पावधीतच जत, डिग्रज, कामेरी (वाघवाडी फाटा) येथेही विक्री, विक्री पश्चात सेवा सुरू केली.

नवीन होत असलेल्या महामार्गामुळे तसेच कोकणात होत असलेल्या व्यवसायिक विस्तार लक्षात घेता कोकणातील ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी चेतन मोटर्स तर्फे मलकापूर येथे सुद्धा कंटेनर वर्कशॉप ची सुरुवात करण्यात आली. तसेच ग्राहकांना तत्पर उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल सर्व्हिस व्हॅनची सुविधा सुद्धा चेतन मोटर्स तर्फे देण्यात येते.

ग्राहक सेवा हाच चेतन मोटर्स भक्कम पाया असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चेतन मोटर्स तर्फे आज पर्यंत ३०,००० हून अधिक वाहनांची विक्री करण्यात आली असून, ५ लाखहून अधिक वाहनांना सर्व्हिस देण्यात आली आहे. विक्री सोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेल्स आणि सर्विस पॉईंट च्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेशी सदैव तत्पर आहे.

चेतन मोटर्सचे वैशिष्ट्य म्हणजे, अगदी सुरुवातीपासून काम करणारे मनुष्यबळ. इथे कामगारांना सतत प्रशिक्षण, नव्या गोष्टींचे ज्ञान दिले जाते. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला जातो. यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना चेतन मोटर्सबद्दल कमालीची तळमळ, आपुलकी वाटते.

या सर्वांमुळे टाटा मोटर्सच्या पश्चिम विभागात चेतन मोटर्स एकदम ‘टॉप’ला आहे. या विभागात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, छत्तीसगडचा समावेश होतो. चेतन मोटर्सच्या उत्कृष्ट सेवेबद्दल टाटा मोटर्सकडून अनेक सन्मान आणि पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आज असणाऱ्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त चेतन मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तेज घाटगे यांनी सर्व ग्राहकांचे आभार व्यक्त केले आणि भविष्यात चेतन मोटर्स नेहमीच तुम्हाला उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी कटीबद्ध राहील ही ग्वाही दिली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!