जुना बदला घेण्यासाठीच शरद पवारांनी सुचवले शाहू महाराजांचे नाव

Spread the news

 

जुना बदला घेण्यासाठीच शरद पवारांनी सुचवले शाहू महाराजांचे नाव

खासदार संजय मंडलिक यांचा आरोप

कोल्हापूर /प्रतिनिधी जुना बदला घेण्यासाठीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना माझ्या विरोधात मैदानात उतरवण्याचे षडयंत्र केला असल्याचा आरोप खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे.

मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, श्रीमंत शाहू महाराज यांची लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा होती की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. याबाबत आपल्याला माहिती नाही; पण, पवार यांना जुना राग काढायचा असेल, बदला घ्यायचा असेल, म्हणूनच त्यांनी महाराजांना मैदानात उतरवण्याचे षडयंत्र रचले. पण, असा राग काढायचा असेल तर जनता त्यांना योग्य जागा दाखवून देईल.

आपण कोणत्याही परिस्थितीत मैदानात उतरणार असल्याचे सांगताना मंडलिक म्हणाले, आपल्या उमेदवारीबाबत संभ्रम असला तरी तो दूर होईल. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा, आपला उमेदवार निवडून यावा असे वाटणे गैर नाही. पण शेवटी उमेदवारी मलाच मिळणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!