यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त अभिवादन

Spread the news

 

नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
——————————-
कोल्हापूर दि १२ –

नव महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या पूर्ण कृती पुतळ्यास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही बी पाटील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अशोक पोवार रमेश मोरे, पद्मा तिवले, राजाभाऊ मालेकर, महादेव पाटील, फिरोज खान उस्ताद अनिल घाटगे, विनायक मुळे, सुरेश कदम, रामभाऊ कोळेकर, विलास मुळीक, जिल्हा परिषद उपमुख्य अधिकारी मनीषा देसाई, प्रकल्प संचालक सुषमा देसाई ,महिला बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील आदींसहकार्यकर्ते कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मेन राजाराम ज्युनिअर कॉलेजच्या प्रा .सुषमा पाटील यांनी याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तुत्वाला उजाळा देऊन चव्हाण यांच्या जीवनातील अनेक प्रसंग उपस्थितांना सांगितले
—————————


Spread the news

You may also like

error: Content is protected !!