- प्रा.अंकुश घुले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
- कोल्हापूरयेथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये सोमवार दि.०४ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे कला व क्रीडा अकादमीचे प्रमुख प्रा.संभाजी पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.डी.कदम होते.
- सदर कार्यक्रमामध्ये मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अंकुश घुले यांना राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. यावेळी महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ.सिंधू आवळे, सायन्स विभागाचे उपप्राचार्य प्रा.पी.एस.चौगुले, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.जी.एम.लवंगारे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.विक्रमसिंह नांगरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा.सरोज(माई) पाटील, महाविद्यालय विकास समिती चेअरमन मा.सौ.संगीता(वहिनी) पाटील, प्रशांत (दादा) पाटील, मा.अजित पाटील, मा.विक्रांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.डी.कदम, डॉ.रवींद्र पाटील, डॉ. एम.डी.कदम, प्रा.समाधान बनसोडे, डॉ.संतोष कदम, डॉ.महेश रणदिवे, कार्यालयीन अधीक्षक श्री.बी.एम.शिंदे तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केले.