*नाम. हसन मुश्रीफ यांच्या* *वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी* *असंघटित कामगार विभागाच्या* *कार्यक्रमाने* *स्वाभिमानी सप्ताह ची सुरुवात*
कोल्हापूर : नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने *स्वाभिमानी सप्ताह* साजरा करण्यात येणार आहे सप्ताहाची सुरुवात आज शनिवार दिनांक 5 एप्रिलला या सप्ताहाचा पहिला कार्यक्रम पक्षाच्या असंघटित कामगार विभागाच्या कार्यक्रमाने सुरुवात केली शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या मार्गदर्शनाने असंघटित कामगार अध्यक्ष नितीन मस्के यांनी बांधकाम कामगारांच्या 40 प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या त्याचा रिपोर्ट हि ताबडतोब देण्यात आल्या तसेच त्यांच्यावर मोफत उपचारासाठी W F C महामंडळाने नेमून दिलेल्या मल्टिप्लेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी ग्रीन हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले
कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथे आज सकाळी दहा वाजता शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य शिबिराबरोबरच बांधकाम कामगार नवीन नाव नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्तीचे फॉर्म मोफत भरण्यात आले. या शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी नवे व जुने बांधकाम कामगारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी साधारण 400 फॉर्म भरण्यात आले. तसेच 300 पेक्षा जास्त ग्रीन हेल्थ कार्ड रक्त तपासण्या करून देण्यात आले. सायंकाळी चार वाजेपर्यंत चाललेले या कार्यक्रमास माजी नगरसेवक उत्तम कोराणे, महेश सावंत, प्रकाश गवंडी, रेखा आवळे, जाहिदा मुजावर, प्रमोद पोवार, पूजा साळोखे, विक्रांत साळोखे, रेहाना नागरकट्टी, दादासाहेब चोपडे, बी के भास्कर, निरंजन पोवार, शोभना खामकर, शगुप्ता पठाण, युवराज साळोखे, सचिन लोहार, शितल तिवडे, बाबू घाटगे, बजरंग देवकर, सोनाली कांबळे, लक्ष्मी मांडेकर, मृणाली पोळ, सोनाली कानबिन्दे, अमृत सुतार, ऋषिकेश देवरुखकर, श्वेता बडोदेकर, सुमन वाडेकर, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला
नितीन मस्के
अध्यक्ष, असंघटित कामगार
कोल्हापूर शहर (जिल्हा)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी