लोटस मेडिकल फाउंडेशनचे कार्य निश्चितपणे कौतुकास्पद
संजय किर्लोस्कर
कोल्हापूर
एचआयव्हीबाधित कुटुंबीयांसाठी सातत्याने २५ वर्षे काम करणाऱ्या लोटस मेडिकल फाउंडेशनचे कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणादायी आहे , असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे चेअरमन संजय किर्लोस्कर यांनी केले.
लोटस मेडिकल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. संस्थेच्या विश्वस्त अध्यक्षा उषा थोरात आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शहा अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ऑल स्मॉल फायनान्स बँकेचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
किर्लोस्कर म्हणाले, हे काम उभारण्यामागे डॉ. किमया शहा यांची तळमळ आणि निष्ठा मनाला स्पर्शन गेली. अमेरिकासारख्या देशांनी भारतातील स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणारी मदत बंद केली आहे, त्यामुळे काही सेवाभावी संस्थांना सामाजिक काम करताना अडचणी येऊ शकतात. पण लोटस फाउंडेशनच्या वाटचालीत किर्लोस्कर समूह सदैव पाठीशी राहील, उषा थोरात यांनी स्वागत केले. डॉ.
किमया शहा यांनी प्रास्तविक केले. या समारंभात संस्थेला मदत करणान्या बिटवाईज फाउंडेशन, आयसीआयसीआय फाउंडेशन, बाल आशा ट्रस्ट, आशाकिरण चॅरिटेबल ट्रस्ट, मोतीभाई दोषी फाउंडेशन, माझगात डॉक शिप बिल्डर्स लि., एमसॅक्स, सरोज आर्यन इंडस्ट्रिज या संस्थेचा सत्कार करण्यात आला. मुलांच्या हस्ते उषा थोरात, डॉ. किमया शहा यांच्यासह व्ही. बी. पाटील,
सचिन डांतर, रमाकांत भिंगार्डे, सुनील गुंडाळे, सल्लागार डॉ. निरंजन शहा या विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी के गुरुराजा, सुनील अरोरा, सीमा देसाई, मयूरी आळवेकर, प्रा. एम. एस. श्रीराम यांनी मनोगत व्यक्त केले. कविता मोदी यांनी कविता सादर केली. दीपक बीडकर यांच्या संस्थेतर्फे ताराबाई छत्रपतींच्या जीवनावर नृत्यविष्कार सादर केला.