दर्पण फाऊंडेशन मार्फत सलग तिसऱ्या वर्षी मोफत स्कॉलरशिप सराव परीक्षा संपन्न
कोल्हापूर
येथील दर्पण फाउंडेशन वतीने व प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिकेच्या सहकार्याने पाचवी स्कॉलरशिप सराव परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर शहर व परिसरातील खाजगी प्राथमिक व महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी जरग नगर येथील महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यालयात ही सराव परीक्षा दिली.
या सराव परीक्षेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, नपा – मनपा प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सुधाकर सावंत न्यू,एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर चे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सर्वच मान्यवरांनी दर्पण फाउंडेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान, प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी आर. व्ही .कांबळे यांनी सदर परीक्षा केंद्रास भेट देऊन उपक्रमासंदर्भात समाधान व्यक्त केले. तसेच स्कॉलरशिप साठी कोल्हापूर पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल असल्याचे सांगून सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे कौतुक केले.
सदर सराव परीक्षेसाठी महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील मॅडम* उपायुक्त – महानगरपालिका, स्कॉलरशिप विभाग प्रमुख श्री. संजय शिंदे, मनपा जरगनगर विद्यालया च्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे, सर्व शिक्षक व सेवक कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले .
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दर्पण चे सचिव संजय कडगावे व आभार संचालक संजय पाटील यांनी मानले.
यावेळी विजय माळी, बाळासाहेब कांबळे,उमेश देसाई, दर्पण
चे उपाध्यक्ष राम भोळे,कार्याध्यक्ष अरुण गोते,सहसचिव सचिन यादव ,खजानिस युवराज सरनाईक, संचालक महादेव डावरे, श्रीपाद रामदासी, तसेच जरगनगर विद्यालयाचे सर्व शिक्षक ,परीक्षेसाठी कामगिरीवर असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी ,सेवक व परीक्षार्थी विद्यार्थी, मोठया संख्येने उपस्थित होते.