पाच वर्षात साडेसात मिनिटे तोंड उघडलेला कार्यसम्राट आमदार…!
चंदगडच्या मविआच्या प्रचारार्थ
डॉ. नंदिनी बाभुळकर यांचे प्रतिपादन
चंदगड
आमदारकीच्या अखंड पाच वर्षाच्या कालखंडात विधानसभेत कार्यसम्राट आमदारांनी केवळ साडेसात मिनिटे तोंड उघडले आहे. ही मी टीका करत नाही. याचे शासकीय रेकॉर्ड नोंद आहे. चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्याच्या जीवघेण्या समस्यांवर जो आमदार साडेसात मिनिटे सभागृहात बोलतो. मग आम्ही त्यांना काय म्हणायचे, असा आमदार तुम्ही परत निवडून देऊन स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेणार आहात काय ? असा खडा सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर यांनी सभेत उपस्थित केला.
. डॉ. बाभुळकर पुढे म्हणाल्या, भाजपाची निती आहे. तोडा आणि फोडाची निती भाजपाची आहे. ते मित्रपक्षाचा ही घात करत आहेत. मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली त्यांनी आपला खरा चेहरा चंदगडमधील समाजासमोर आणला आहे. आयुष्यभर निष्ठेने, त्यागाने उभे केलेले स्व. बाबासाहेब कुपेकर शरद पवार यांचे विचार पायदळी तुडवले आहेत, सूज्ञ खपवून घेणार आहे का ? आजपर्यंत जनता याचा निषेध करत आहे. मतदारांमध्ये याचा आहे.
अघोरी बाबुराव हळदणकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात अतिशय चांगले कार्य केले आहे. हॉस्पिटलमध्ये लोकांना ऑक्सीजन मिळणे कठीण झालं. त्यांनी प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन प्लॅन्ट बसवले. चंदगडलाही बसवला. पण या कार्यसम्राटांना तो चालू करता आला नाही अशी टीका करत तो किलोवर भंगारात विकण्याची वेळ आली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या विलास पाटील, रामराज कुपेकर, संभाजीराव देसाई- शिरोलीकरांसह मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. आणि त्यांनी मतदार आली तुम्ही तो
संताप व्यक्त केला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही तोच संताप दाखवा असं आवाहन डॉ. बाभुळकर यांनी केले.