*”28 जुलै – जागतिक कावीळ दिन कारागृहात साजरा”*
*सातारा जिल्हा कारागृहात राज्य शासनाचे “राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत “जागतिक कावीळ दिन” साजरा करण्यात आला.*
कोल्हापूर
जागतिक कावीळ दिनानिमित्त आज सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक श्री युवराज करपे यांचे सहयोगाने
कारागृहातील बंदयांचे रक्त नमुने तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये कारागृहातील एकूण 35 बंद्यांची तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक ते औषध उपचार याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून औषधांचा पुरवठा देखील करण्यात आला. त्याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथील श्रीमती गीतांजली जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ आयसीटीसी विभाग, श्रीमती सुनंदा शिंगटे समुपदेशक आयसीटीसी, श्रीमती रूपाली कदम प्रयोगशाळा तंत्रज्ञ कावीळ विभाग, श्री सोहेल खान सहाय्यक टीबी विभाग यांनी बंद्यांची तपासणी व रक्ताचे नमुने घेतले.
सदर कार्यक्रमास शामकांत शेडगे, कारागृह अधीक्षक, श्री ज्ञानेश्वर दुबे वरिष्ठ तुरुंगाधिकारी, श्री राजेंद्र भापकर वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार श्री दारकु पारधी, शिपाई श्रीमती लता काळकुटे, श्रीमती रेश्मा गायकवाड, श्री चांद पटेल इत्यादी व इतर बंदी उपस्थित होते.